horoscope Saam tv
राशिभविष्य

Sunday Horoscope : दवाखाने मागे लागतील, विनाकारण पैसे खर्च होतील; ५ राशींच्या लोकांची चिंता वाढणार

Sunday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांच्या मागे दवाखाने लागण्याची शक्यता आहे. काहींचे विनाकारण पैसे खर्च होतील. वाचा रविवारचं राशीभविष्य

Anjali Potdar

आजचे पंचांग

सोमवार,१४ जुलै २०२५,आषाढ कृष्णपक्ष,संकष्टी चतुर्थी.

तिथी-चतुर्थी २४|००

रास- कुंभ

नक्षत्र-धनिष्ठा

योग-आयुष्मान

करण-बवकरण

दिनविशेष-शुभ दिवस

मेष - आज संकष्टी चतुर्थी आहे. विशेष गणेश उपासना आपल्याला फायद्याची ठरेल. गुंतवणूक मधून लाभ आहेत. नवनवीन गोष्टी शिकण्याचा आज अट्टाहास राहील. दिवस आनंदी आहे.

वृषभ - कामाबरोबर मनोरंजनात्मक गोष्टींमध्ये सुद्धा सहभाग घ्याल. कलाक्षेत्रामध्ये असणाऱ्या लोकांना प्रयत्न तर करावे लागतील पण म्हणेल तसे यश मिळेल असे वाटत नाही. राजकारणामध्ये पुढाकार घेऊन कामे कराल. 

मिथुन - आज संकष्टी चतुर्थी गणेश उपासना करावी. त्याचे द्विगुणीत फल आपल्याला मिळेल. उत्तम संवादाने प्रगती साधाल . दूरचे प्रवास घडतील.

कर्क - कोणाचे सहकार्य मिळेल आज अशी अपेक्षा नको. शारीरिक आणि भावनिक आंदोलने होतील. मात्र आयुष्य एकट्याचा प्रवास आहे हे आज स्वीकारून पुढे जावे लागेल.

सिंह - अनेक रिंगाळत असलेली कोर्टाच्या कामामध्ये यश मिळेल. व्यवसायामध्ये भरीव गोष्टी कराल. आपले सादरीकरण आज उत्तम राहील. इतरांवर वचक ठेवाल. 

कन्या - पोटाशी निगडित आजार होऊ शकतात. काळजी घ्यावी. आजोळी संबंध सुधारतील. नोकरीमध्ये मात्र गती आणि प्रगती दोन्हीही आहे. 

तूळ -प्रेमाच्या लोकांबरोबर आनंद लुटाल . गुलाबी स्वप्न आज साकार होतील. मनातल्या गोष्टी पूर्ण झाल्यामुळे आनंदाला उधाण येईल. कलाकारांना नवीन सृजनशील गोष्टी सुचतील. गणपती उपासना करा.

वृश्चिक - थोडे तुझे थोडे माझे असे करत दिवस घालवावा लागेल. इतरांचे सल्ले आज विचारात घ्या. घर, गाडी घेण्याचा विचार करत असाल तर आज त्यासाठी ग्रीन सिग्नल आहे. 

धनु -आपला सकारात्मक ओरा आज राहील. जवळच्या लोकांकडून आपली प्रशंसा होईल. मात्र द्विधा मनस्थिती आज टाळणे गरजेचे आहे. जे निर्णय घ्याल ते योग्य ठरतील याचा विश्वास ठेवा. 

मकर - हिशोबी असणारी आपली रास कष्टिक असणारी आपली रास पैशासाठी आज प्राण ओतून काम करावे लागेल. कुटुंबीयांच्या सहकार्याने यामध्ये यश सुद्धा मिळेल. गुंतवणूक करावी अशाही भावना येतील .

कुंभ - बुद्धीला पटतील असाच गोष्टी आज करण्याचा मानस राहील. इतरांवर आपला सकारात्मक प्रभाव राहील. काही गोष्टींचा वचक ठेवल्यामुळे मनासारख्या गोष्टी आज घडवून घ्याल.

मीन- दवाखाने मागे लागतील. एखाद्या आजाराचं लगेचच निदान लागेल असे वाटत नाही. मानसिक अस्वस्थता आज वाटेल. विनाकारण पैसे खर्च होतील. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha News : अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये सीटवर बसण्यावरून वाद; तरुणाकडून प्रवाशावर ब्लेडने सपासप वार

Viral Video: मी आता आझाद झालोय! घटस्फोटाच्या आनंदात पठ्ठ्याची दुधाने अंघोळ, व्हिडिओ व्हायरल

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं; संभाजी ब्रिगेड आक्रमक

युतीसाठी ठाकरेसेनेचं रोखठोक,ठाकरेंचा चेंडू शिवतीर्थच्या कोर्टात,राज ठाकरेंचे मौन कधी सुटणार?

SCROLL FOR NEXT