Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Sun Transit : आजपासून या 5 राशींवर सूर्य देवाची होईल कृपा, प्रत्येक कामात मिळेल यश

Rashi Bhavishya : सूर्य देवाच्या नक्षत्रात बदल झाल्यामुळे काही राशीच्या लोकांचं भाग्य चमकेल. चला जाणून घेऊया सूर्याच्या राशीत बदलामुळे कोणत्या राशींचे भाग्य उजळेल...

Saam TV News

आज म्हणजेच 19 जुलै रोजी सूर्य देव नक्षत्र बदलणार आहे. या दिवशी सूर्यदेव पुष्य नक्षत्रात प्रवेश करतील. ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवाला विशेष स्थान आहे. सूर्य देवाला सर्व ग्रहांचा राजा म्हणतात. जेव्हा सूर्य शुभ असतो तेव्हा त्याचे चांगले परिणाम व्यक्तीच्या जीवनात पाहायला मिळतात. सूर्य देवाच्या नक्षत्रात बदल झाल्यामुळे काही राशीच्या लोकांचं भाग्य चमकेल. चला जाणून घेऊया सूर्याच्या राशीत बदलामुळे कोणत्या राशींचे भाग्य उजळेल...

मेष: नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल. आर्थिक बाजू चांगली राहील. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल. मान-सन्मान आणि पद-प्रतिष्ठेत वाढ होईल.

वृषभ: व्यवहारासाठी वेळ शुभ आहे. यावेळी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. आर्थिक लाभ होईल, ज्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. आजपासून या राशींचे चांगले दिवस सुरू होतील.

मिथुन: आर्थिक लाभ होईल. मान-सन्मान, पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी उच्च अधिकाऱ्यांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील. जोडीदारासोबत वेळ घालवा.

सिंह: आयुष्य आनंदाने भरून जाईल. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठीही वेळ शुभ आहे. या काळात पदोन्नतीचीही शक्यता आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल.

धनु: या काळात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काळ शुभ आहे. जोडीदारासोबत वेळ घालवा. कठोर परिश्रम केल्याने तुम्हाला तुमच्या कार्यात नक्कीच यश मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT