Horoscope in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Monday Horoscope : संसारात गोडवा निर्माण होईल, खिशात पैसा टिकणार; ५ राशींच्या लोकांवर होणार भगवान शंकराची कृपा

Monday Horoscope in Marathi : काही राशींंच्या लोकांच्या संसारात गोडवा निर्माण होईल. तर काहींना धनलाभ होईल. वाचा सोमवारचं राशीभविष्य

Saam Tv

मेष : दिवसभर चांगली ऊर्जा राहील. सकाळी महत्वाचे कामे पटकन पूर्ण कराल. महत्वाचं काम रखडल्याने चिडचिड वाढेल. खिशात पैसा खेळता राहील.

वृषभ : कामात व्यग्र राहाल. मनात नवे काम करण्याची इच्छा राहील. आयुष्यात छोटे बदल महत्वाचे वाटेल. पैसा आणि कामात स्थिरता राहील. कुटुंबाची साथ लाभल्याने मन प्रसन्न होईल.

मिथुन : प्रत्येकाला होकार देण्याचा चूक महागात पडू शकते. दिवसभराच्या कामाने तणाव जाणवू शकतो. दिवसभर छोटे छोटे खर्च होतील.

कर्क : मन थोडे भावुक राहील. एखाद्याचं बोलणं मनाला लागू शकते. धिम्या गतीने काम करणे फायदेशीर ठरेल. शांत ठिकाणी गेल्यास मन प्रसन्न होईल.

सिंह : कार्यालयात दबदबा राहील. आज तुमचं मन शांत आणि नियंत्रणात राहील. करिअरसाठी चांगला दिवस आहे. फक्त वर्तवणूक चांगली ठेवा.

कन्या : जबाबदारी वाढू शकते. दिवसभरात आराम करण्यास विसरू नका. कुटुंबाच्या साथीने महत्वाचं काम सहज पूर्ण होतील.

तुला : छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करा. कामात सुधारणा कराव्या लागतील. जास्त विचार करणे टाळावे.

वृश्चिक : दिवसभर मन सजग राहील. गरजेच्या बाबींवर विचार करावा. अति विचार करणे टाळा.

धनु : मन आनंदी राहील. गरज भासल्यास तुमची बाजू मांडायला विसरू नका. मन विचलित होण्याची शक्यता आहे.

मकर : कुटुंबातील सदस्यांच्या शब्दाने मन जड होण्याची शक्यता आहे. कामे व्यवस्थितरित्या पूर्ण होईल. जास्त विचार करणे नुकसानदायक ठरेल.

कुंभ : रखडलेली कामे पूर्ण होतील. कामावर लक्ष केंद्रीत करणे फायद्याचे ठरेल. दिवसभर चिंतेत असाल.

मीन : पार्टनरसोबत फिरायला जाण्याचा योग आहे. जुने मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल. प्रवासात शांत राहिल्याने वाद कमी होतील.

Disclaimer : लेख ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ही माहिती अचूक असल्याचा आमचा दावा नाही. महत्वाचा निर्णय घेण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT