Raksha Bandhan 2025 Vishesh Yog saam tv
राशिभविष्य

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाच्या दिवशी ६ ग्रह येणार एकत्र; दुर्मिळ संयोगाचा ३ राशींना होणार भरपूर फायदा

Raksha Bandhan 2025 Vishesh Yog: यंदाचे रक्षाबंधन ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अतिशय खास आणि दुर्मिळ मानले जात आहे. ९ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होणाऱ्या रक्षाबंधनानिमित्त अनेक वर्षांनंतर ६ प्रमुख ग्रह एका विशेष स्थितीत येत आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

भाई-बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक असलेला रक्षाबंधन सण यंदा उद्या म्हणजेच शनिवार 9 ऑगस्ट 2025 रोजी साजरा केला जाणार आहे. विशेष म्हणजे यंदाचा रक्षाबंधन सण फक्त धार्मिकदृष्ट्या नाही तर ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण तब्बल 297 वर्षांनी ग्रहांची अशी दुर्मीळ स्थिती या दिवशी पाहायला मिळणार आहे.

297 वर्षांनंतर घडतोय खास योग

रक्षाबंधनच्या दिवशी केतू सिंह राशीत, राहू कुंभ राशीत तर शुक्र आणि गुरू मिथुन राशीत एकत्र येणार आहेत. सूर्य कर्क राशीत आणि चंद्र मकर राशीत राहणार आहे. त्याचप्रमाणे मंगल कन्या राशीत आणि बुध कर्क राशीत स्थित असणार आहे. या सगळ्या ग्रहांची ही विशिष्ट रचना 297 वर्षांपूर्वी म्हणजे 1728 साली झाली होती. यंदाही तसंच होत असून भद्राकाळ पृथ्वीवर नसल्यामुळे रक्षाबंधनाचा मुहूर्त अत्यंत शुभ मानला जातोय.

या ग्रहयोगाचा कसा होणार परिणाम?

ज्योतिषशास्त्रज्ञांच्या मते, अशा प्रकारचा दुर्मीळ ग्रहयोग मानवी जीवनावर विशेष प्रभाव टाकतो. याचा फायदा विशेषतः काही राशींना होणार असून त्यांना नशिबाने भरभरून साथ देणार आहे. अचानक धनलाभ, करिअरमध्ये यश, नवीन जबाबदाऱ्या, सुखप्राप्ती यांचा अनुभव काही लोकांना मिळू शकतो.

तूळ राशी

रक्षाबंधनाच्या दिवशी 6 ग्रहांचा एकत्रित योग या राशीसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना मोठे ऑर्डर्स मिळू शकतात. काहीजण आपल्याच प्लॉटवर घर बांधण्याचा निर्णय घेऊ शकतात. पूर्वी अडकलेले पैसे परत मिळण्याचीही शक्यता आहे.

कुंभ राशी

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा रक्षाबंधन सण अत्यंत सुखदायक ठरू शकतो. बेरोजगार तरुणांना चांगल्या पॅकेजसह नोकरी मिळू शकते. उत्पन्नाचे एकाहून अधिक स्रोत निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे आर्थिक स्थैर्य लाभणार आहे. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार पक्का होऊ शकतो.

मकर राशी

मकर राशीसाठी हा रक्षाबंधन अत्यंत शुभ फलदायी असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 297 वर्षांनी तयार होणारा ग्रहसंयोग या राशीसाठी विशेष लाभदायक ठरू शकतो. नोकरीत मोठ्या जबाबदाऱ्यांची संधी मिळू शकते. उत्पन्न वाढेल, संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते आणि आरोग्यही उत्तम राहील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime News: पुण्यात दहशत; हातात धारदार कोयते, गलिच्छ शिव्या देत टोळक्यांचा धुडगूस|VIDEO

Health Tips: महिलांना दररोज किती तासांची झोप असते आवश्यक? महिला पुरुषांपेक्षा जास्त वेळ झोपतात?

Maharashtra Live News Update: - मुंबई आग्रा महामार्गावर टेम्पोने शाळकरी विद्यार्थ्यांना उडवलं

Bad Cholesterol: शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यास कोणती लक्षणे दिसतात?

Pune News: पुणे पोलिस ताफ्यात ५ ‘दृष्टी’ वाहनांची भर; एआय कॅमेऱ्याने ३६० डिग्री नजर|VIDEO

SCROLL FOR NEXT