Astrology Predictions saam tv
राशिभविष्य

Astrology Predictions : शनीची उलटी चाल ५ राशींचं टेन्शन वाढवणार? नोकरी, पैसा आणि नात्यांवर होणार परिणाम

Shani Vakri Until December 11: नोव्हेंबर २०२६ मध्ये शनी मीन राशीत वक्री अवस्थेत असून ही चाल ११ डिसेंबर २०२६ पर्यंत सुरू राहील.

Sakshi Sunil Jadhav

ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला कर्मफळदाता मानलं जातं. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देणारा ग्रह म्हणून शनीची ओळख आहे. त्यामुळे शनीच्या राशीतल्या बदलांना ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व दिलं जातं. नोव्हेंबर २०२६ मध्ये शनी मीन राशीत वक्री अवस्थेत असल्याने काही राशींच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये.

शनीची वक्री चाल ११ डिसेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. या काळात नोकरी, व्यवसाय, आर्थिक व्यवहार आणि कौटुंबिक संबंधांमध्ये सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे. विशेषतः पाच राशींच्या व्यक्तींनी कोणताही निर्णय घेताना घाई करू नये. चला तर मग जाणून घेऊया, कोणत्या आहेत त्या पाच राशी.

१. वृषभ राशी (Taurus)

वृषभ राशीच्या व्यक्तींनी नोव्हेंबर महिन्यात आर्थिक व्यवहारांबाबत विशेष काळजी घ्यावी. कोणालाही विचार न करता पैसे उधार देणे टाळा. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे.

वरिष्ठांशी बोलताना शब्द जपून वापरा. व्यवसायात मोठे निर्णय घाईघाईने घेऊ नका. तसेच घरातील छोट्या गोष्टींवरून वाद होणार नाहीत, याची काळजी घ्या.

२. मिथुन राशी (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा महिना कामाच्या बाबतीत आव्हानात्मक ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील आणि काही नवीन अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर घाई करू नका. व्यावसायिकांनी मोठे आर्थिक व्यवहार आणि नवीन सौदे काळजीपूर्वक करावेत. त्याचबरोबर आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

३. तूळ राशी (Libra)

तूळ राशीच्या व्यक्तींनी या काळात कामाच्या ठिकाणी विशेष सतर्क राहावे. इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका. आर्थिक नियोजन व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे.

अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. जुन्या वादांमुळे किंवा कायदेशीर प्रकरणांमुळे मनस्ताप होऊ शकतो. मात्र संयम आणि योग्य निर्णयांच्या मदतीने परिस्थिती हाताळता येईल.

४. मकर राशी (Capricorn)

मकर राशीच्या लोकांना या महिन्यात काम आणि कुटुंब यांच्यात समतोल राखावा लागेल. कामात मेहनत अधिक घ्यावी लागू शकते. मात्र त्याचे अपेक्षित परिणाम मिळण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.

कोणतेही काम अर्धवट सोडू नका. व्यावसायिकांनी आर्थिक व्यवहार करताना सावध राहावे. कुटुंबीयांसाठी वेळ काढा आणि विनाकारण ताण घेणे टाळा.

५. कुंभ राशी (Aquarius)

कुंभ राशीच्या व्यक्तींनी नोव्हेंबर महिन्यात पैशांच्या बाबतीत सतर्क राहणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च वाढू शकतो. कोणाला पैसे उधार देण्यापूर्वी त्याचा नीट विचार करा.

नोकरी करणाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा करू नये. गुंतवणुकीचे निर्णय घाईने घेणे टाळा. कुटुंबातील सदस्यांशी बोलताना संयम ठेवा, अन्यथा छोट्या गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Holiday : ११ नोव्हेंबरला बँका बंद की सुरू? RBI ने जाहीर केली शहरांची यादी; लगेच तपासा

Morning joint stiffness: सकाळच्या वेळी हात-पाय आखडतात का? अजिबात करू नका दुर्लक्ष, हा असू शकतो भयंकर आजाराचा इशारा

Lemon Water Vs Ginger Water: लिंबू की आल्याचे पाणी, वजन कमी करण्यासाठी काय प्यावे?

Ramayana Yash Look: ३३ किलोचे कपडे, १.८ किलोचा मुकुट; 'रामायण'मध्ये असा साकारला यशचा रावण लूक!

Maharashtra News Live Update: शिवसेना नेते मुकेश जिवतोडे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT