Shani dev Saam TV
राशिभविष्य

Shani Dev Favourite Zodiac: शनिदेवाला या 3 राशी आहेत खूप प्रिय, शनीच्या कृपेने आयुष्यात येते भरभराट

Shani Dev : शनिदेव हे कठोर स्वभावाचे ग्रह मानले जातात. परंतु राशीचक्रातील अशा 3 राशी आहेत ज्यांच्यावर त्यांचा आशीर्वाद नेहमीच असतो. ते या राशीच्या लोकांना भरभराट करण्यास आशीर्वाद देत असतात.

Bharat Jadhav

सर्व नऊ ग्रहांमध्ये शनिदेवाला सर्वात क्रूर मानले जाते. ते कोणाचेही स्वतःचे नाहीत आणि परकेही नाहीत. जगाचा निर्माण करणाऱ्या भगवान विष्णूने त्यांच्यावर न्यायाधीश म्हणून मोठी जबाबदारी सोपवलीय. त्यामुळे ते सर्वांशी असा न्याय करतात. शनिदेव ही जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडतात आणि कोणताही भेदभाव न करता व्यक्तींच्या कर्मानुसार योग्य परिणाम देतात. दरम्यान पण राशीचक्रात अशा काही राशी आहेत, ज्या शनिदेवाला खूप प्रिय आहेत.

त्यांचा आशीर्वाद नेहमीच त्यांच्यावर असतो. ते त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. इतकेच नाही तर त्यांच्या मार्गात कोणताही अडथळा येऊ देत नाही. कोणत्या आहेत या राशी हे जाणून घेऊ.

मकर

ही राशी शनिदेवाला अतिशय प्रिय आहे. या राशीच्या लोकांवर शनिदेवाची नेहमी कृपा असते. शनिदेवाच्या आशीर्वादाने ते जे काही काम सुरू करतात त्यात यश प्राप्त होते. मकर राशीच्या लोकांना कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. ते कर्जाच्या भोवऱ्यात बुडत नाहीत. त्यांना कधी कर्ज घ्यावे लागले तरी ते ते फार लवकर फेडतात. शनीच्या कृपेमुळे त्यांना समाजात खूप मान आहे.

धनु

शनिदेव स्वतः धनु राशीच्या लोकांचे रक्षण करतात. ते ढाल म्हणून काम करतात आणि सर्व संकटांपासून त्यांचे संरक्षण करतात. धनु राशीच्या मार्गात येणारे अडथळे शनिदेव दूर करतात. धनु राशीचे लोक त्यांच्या करिअरमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळवतात. शनिदेवाच्या कृपेने त्यांचे आरोग्य चांगले राहून जीवनातील सर्व सुखांचा उपभोग घेतात.

तूळ

या राशीच्या लोकांमध्ये तीव्र इच्छाशक्ती आणि एकाग्रता क्षमता असल्याचे मानले जाते. तूळ राशीच्या लोकांवर शनीची कृपा नेहमी राहते. या राशींच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात कधीही कोणत्याही प्रकारची वंचितता येत नाही. नोकरी असो वा व्यवसाय, प्रत्येक क्षेत्रात ते यश मिळवतात. शनीची नित्य पूजा केल्याने त्याच्या मार्गातील सर्व अडथळे आपोआप दूर होतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan : २ लाख शेतकऱ्यांना मोठा झटका, पीएम किसान योजनेचे पैसे बंद, तुमचे नाव तर नाही ना?

Maharashtra News Live Update: मुंबईत पाऊस, मुंबईकरांना दिलासा

Pune Nashik Railway: पुणे-नाशिक रेल्वे मार्गात महत्वाचा बदल; ताशी १६० किमी वेगाने होणार प्रवास, कसा असेल संपूर्ण लोहमार्ग?

यंदा 'फादर्स डे' कधी आहे? वडिलांना खूश करणाऱ्या 3 बेस्ट आयडिया

Diabetes: औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज 15 मिनिटं करा हे रुटीन फॉलो, लगेचच मिळेल आराम

SCROLL FOR NEXT