Shani Budh Kendra Yog saam tv
राशिभविष्य

Shani-Budh Kendra Yog: न्यायदेवता शनी बनवणार शक्तीशाली योग; 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Shani Budh Kendra Yog 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, न्यायाचा देवता शनी येत्या काळात खास योग बनवणार आहे. यावेळी ९ जून रोजी बुधासोबत ९० अंशांवर असणार आहे. ज्यामुळे केंद्र योग तयार होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर राशीबदल करतात. यामध्ये शनी ग्रहाचा देखील समावेश आहे. दंड देणारा शनि हा सर्वात क्रूर आणि शक्तिशाली ग्रह मानला जातो. शनि हा एकमेव ग्रह आहे जो सर्वात संथ गतीने फिरतो. यामुळे त्याचा प्रभाव राशींवर बराच काळ राहतो.

शनि सुमारे अडीच वर्षांनी राशी गोचरनंतर गुरुच्या राशी मीन राशीत प्रवेश केला आहे. यावेळी तो २०२७ पर्यंत याच राशीत राहणार आहे. कोणत्या ग्रहाशी युती किंवा दृष्टी असेल ज्यामुळे अनेक प्रकारचे योग निर्माण होणार आहे. शनि ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाशी केंद्र योग तयार करणार आहे. यावेळी कोणत्या राशींना याचा फायदा होणार आहे ते पाहूयात.

मकर रास

या राशीच्या लोकांसाठी शनि-बुध ग्रहाचा केंद्र योग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. शनि या राशीच्या तिसऱ्या घरात आणि बुध सहाव्या घरात असणार आहे. या राशींच्या लोकांना आर्थिक बाबतीत लाभ मिळण्याची शक्यता आहे. लेखनाशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांना भरपूर लाभ मिळू शकणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येऊ शकतो.

कुंभ रास

या राशीच्या लोकांसाठी केंद्र योग भाग्यवान ठरू शकतो. या राशीच्या लोकांवर शनीचा मोठा प्रभाव पडू शकतो. आयुष्यात दीर्घकाळ चालणाऱ्या समस्या संपू शकणार आहेत. आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील आहे. परदेशात काम करणाऱ्या लोकांनाही खूप फायदे मिळू शकतात. यावेळी तुम्हाला प्रचंड यश मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ रास

या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रात लाभ मिळू शकतात. या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकणार आहे. मानसिक ताण थोडा कमी होऊ शकणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं वर्चस्व खूप असणार आहे. नोकरीत पदोन्नतीची शक्यता देखील आहे. तुम्हाला खूप यश मिळू शकतं.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यावर बनावट गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र प्रकरणी कारवाई

Face Care: चेहरा धुतल्यानंतर २ मिनिटांच्या आत करा हे काम; मेकअपशिवायही ग्लो करेल चेहरा

तुकाराम मुंढे यांचा शाळांसाठी नवा आदेश; शाळेतील मध्यान्ह भोजनासाठी FDAची नवी नियमावली

Thursday Horoscope : आळस टाळा, 4 राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ; वाचा उद्याचे राशीभविष्य

Health Care : रात्री झोपताना तुमच्याही पायात गोळा येतो का? 'या' गंभीर आजाराचे असू शकतात संकेत

SCROLL FOR NEXT