Shani Nakshatra Gochar  saam tv
राशिभविष्य

Shani Nakshatra Gochar: शनी देव राहुच्या नक्षत्रात करणार प्रवेश; 3 ऑक्टोबरपासून 'या' राशी होणार मालामाल

Shani Nakshatra Gochar 2024: ३ ऑक्टोबर रोजी कर्माचे दाता शनी देव शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. जाणून घेऊया शनीच्या नक्षत्र गोचरमुळे कोणत्या राशींवर कसा परिणाम होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

प्रत्येक महिन्यात ग्रहांच्या स्थितीमध्ये काही ना काही बदल होत असतो. यावेळी शनी आणि राहुच्या स्थितीत ऑक्टोबरमध्ये बदल होणार आहे. ३ ऑक्टोबर रोजी कर्माचे दाता शनी देव शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्राचा स्वामी राहू आहे. शनीच्या राहुच्या नक्षत्र गोचरमुळे काही राशींच्या व्यक्तींवर याचा परिणाम होणार आहे.

सर्व ग्रहांमध्ये शनी हा सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह मानला जातो. यावेळी शनीच्या हालचालीतील छोटासा बदल तुमच्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करणार आहे. जाणून घेऊया शनीच्या नक्षत्र गोचरमुळे कोणत्या राशींवर कसा परिणाम होणार आहे.

मेष रास

शनीचं राहुच्या नक्षत्रातील गोचर अशुभ परिणाम देतं. मात्र मेष राशींच्या व्यक्तींसाठी हे लाभदायक ठरणार आहे. तुमच्या आयुष्यातील जुन्या समस्यांपासून आराम मिळणार आहे. तुम्हाला धनलाभ होऊ शकतो.

सिंह रास

सिंह राशींच्या व्यक्तींना शनीचं नक्षत्र गोचर चांगलं फळ देणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांची मदत मिळू शकणार आहे. नवं काम सुरु करण्यासाठी ही चांगली वेळ आहे.

कन्या रास

शनीच्या शतभिषा नक्षत्र गोचरमुळे या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे. नवा काम सुरु करणाऱ्या व्यक्तींसाठी ही योग्य वेळ ठरणार आहे. तुमच्या आयुष्यात सुखाचे क्षण येणार आहेत.

धनु रास

धनु राशीच्या व्यक्तींना शनीच्या नक्षत्र गोचरमुळे भरपूर प्रमाणात पैसे मिळू शकतात. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. प्रत्येक कामामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकणार आहात.

मीन रास

या राशींच्या व्यक्तींना शनीच्या नक्षत्र गोचरमुळे सकारात्मक परिणाम मिळणार आहेत. येत्या काळात तुम्हाला लाभ होणार आहे. तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होणार आहे. कुटुंबातील व्यक्तींमधून काहीतरी चांगली बातमी मिळू शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आमदार सुरेश धस यांची हजारो वंचितांसोबत दिवाळी साजरी

Singer Passes Away: प्रसिद्ध गायकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ३५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Buldhana: 'घंटागाडी नाही आली? म्हणून मीच आलो', माजी नगरसेवकाने सायकल रिक्षा घेऊन कचरा केला गोळा; पाहा VIDEO

Devgiri Fort History: दऱ्या, टेकडी आणि निसर्गसौंदर्याचा संगम; दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याचा इतिहास जाणून घ्या

सावत्र आईसोबत प्रेमसंबंध, बायकोनं जाब विचारल्याने नवरा संतापला, गोळ्या झाडून संपवलं, मुलाच्या जबाबातून पितळ उघड

SCROLL FOR NEXT