shani margi Saam Tv
राशिभविष्य

Shani Margi : दिवाळीनंतर शनी होणार मार्गस्थ; न्याय देवता 'या' राशींना देणार बक्कळ पैसा

Saturn Planet Margi 2024: यंदाच्या दिवाळीमध्ये अनेक ग्रह त्यांच्या राशीत बदल करणार आहे. न्याय देवता शनी देव त्यांच्या स्थितीमध्ये बदल करणार आहेत. दिवाळीनंतर शनी देव मार्गी होणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

दिवाळी सुरु होण्यासाठी आता अवघा काही काळ बाकी आहे. यंदाची दिवाळी ही ज्योतिष्य शास्त्राच्या हिशोबाने देखील महत्त्वाची आहे. यंदाच्या दिवाळीमध्ये अनेक ग्रह त्यांच्या राशीत बदल करणार आहे. ज्यामध्ये शनी देवाचा देखील समावेश आहे.

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, न्याय देवता शनी देव त्यांच्या स्थितीमध्ये बदल करणार आहेत. दिवाळीनंतर शनी देव मार्गी होणार आहेत. शनी देवाच्या या स्थितीमुळे काही राशींच्या व्यक्तींचं आयुष्य उजळणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

वृषभ रास

शनिदेवाची मार्गी स्थिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकणार आहे. नोकरदार लोकही या महिन्यात प्रगती करू शकणार आहेत. तुमच्या नियोजित योजना यशस्वी होऊ शकतात.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिदेवाची मार्गी चाल अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात नशीब तुमच्या बाजूने असणार आहे. बरेच दिवस रखडलेलं काम पूर्ण होऊ शकतात. यावेळी नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकणार आहेत. धार्मिक आणि शुभ कार्यक्रमातही सहभागी होऊ शकता.

मकर रास

शनिदेवाची मार्गी स्थिती तुमच्यासाठी शुभ असू शकणार आहेत. या काळात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायात पैसे कमावण्याच्या चांगल्या संधी मिळू शकणार आहेत. व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुमचं भरपूर कौतुक होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jolly LLB 3 : अक्षय आणि अर्शदला पुणे न्यायालयाचा दणका, 'जॉली एलएलबी ३' वादाच्या भोवऱ्यात

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

Rain Grant Scam : अतिवृष्टी अनुदान घोटाळा; अखेर २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, २५ कोटींचा अपहार केल्याचा ठपका

SCROLL FOR NEXT