Saturn Venus conjunction saam tv
राशिभविष्य

Saturn Venus conjunction : 29 मार्च रोजी बनणार शनी-शुक्राची युती; 'या' राशींचं नशीब चमकणार, धनलाभाचेही प्रबळ योग

Conjunction Of Saturn And Venus 2024: 29 मार्चला शनि आणि शुक्र एकत्र येणार आहेत. ही घटना मीन राशीत घडणार आहे. यामुळे काही राशींच्या लोकांसाठी सकारात्मक काळाची सुरुवात होईल. या कालावधीत काहींना मोठ्या संधी मिळतील.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेवाला कर्म, खनिजे यांचा कारक मानलं जातं. तर शुक्र ग्रहाला ज्योतिष्य शास्त्रामध्ये वैभव, आनंद, संपत्ती, वैवाहिक जीवन यांचा कारक मानला जातो. येत्या काळात म्हणजेच अवघ्या दोन दिवसांनी या दोन्ही ग्रहांची युती होणार आहे.

२९ मार्च रोजी शनि आणि शुक्र यांची युती होणार आहे. ही युती ३० वर्षांनी मीन राशीत होणार आहे. ज्यामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होणार आहे. या काळात काही राशींच्या व्यक्तींना चांगला लाभ मिळणार आहे तर काही राशींच्या आयुष्यात नव्याने आनंद येणार आहे. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार ते पाहूयात.

वृषभ रास

शुक्र आणि शनीची युती तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. या काळात तुमचं उत्पन्न वाढू शकणार आहा. काम आणि व्यवसायातही प्रगती होण्याची शक्यता आहे. सध्याच्या किंवा जुन्या गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. करिअरमध्ये पदोन्नती किंवा नवीन प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे.

मिथुन रास

तुमच्यासाठी, शुक्र आणि शनीची युती नोकरी शुभ ठरणार आहे. या वेळी, करिअरमध्ये प्रगती आणि व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. तुम्ही केलेल्या प्रयत्नांना योग्य ती मान्यता मिळू शकते. जीवनाच्या अनेक क्षेत्रात यश मिळण्याची चिन्हं आहेत. कोर्टाच्या कामांमध्ये तुम्हाला यश मिळू शकणार आहे.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी शनी आणि शुक्र यांचं संयोजन फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी तुमच्याकडे काही लक्झरी वस्तू असू शकतात. तुम्हाला संपत्ती मिळू शकणार आहे. संपत्ती वाढीसाठी विशेष संधी निर्माण होऊ शकतात. व्यवसाय वाढवण्याचा विचार करणार आहात. सासू-सासऱ्यांशी चांगले संबंध असतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Missing : 'मुन्ना भाई एमबीबीएस'मधील लोकप्रिय अभिनेता बेपत्ता; गर्लफ्रेंडसोबत होती भांडणं, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

Lifestyle: हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यामागे आपल्या 'या' घाणेरड्या सवयी कारणीभूत; धोका कोणाला जास्त?

SCROLL FOR NEXT