Shani Dev Saam Tv
राशिभविष्य

Shani Dev: पुढच्या वर्षी शनीच्या चालीत होणार ५ वेळा बदल; शनी देव या राशींना करणार श्रीमंत

ज्योतिषांच्या मते, पुढील वर्षी म्हणजे २०२६ मध्ये शनिचा गोचर तब्बल ५ वेळा बदलणार आहे. हा बदल अत्यंत दुर्मिळ मानला जातो आणि त्याचा प्रभाव थेट राशींवर होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक पंचांगानुसार, वर्ष 2026 मध्ये अनेक छोटे आणि मोठे ग्रह राशी बदल करणार आहेत. यात कर्मफलदाता आणि न्यायाधीश मानले जाणारे शनि देव यांचाही समावेश आहे. शनि देव चार महिन्यांच्या अंतराने वक्री आणि मार्गी होणार आहे. याशिवाय मार्च आणि एप्रिल महिन्यात शनि अस्त आणि उदय होतील.

दरम्यान शनीच्या या बदलांचा परिणाम सर्व राशींवर दिसून येणार आहे. मात्र, तीन राशी अशा आहेत ज्यांना शनीच्या या बदलामुळे विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. या राशींना पद-प्रतिष्ठा आणि यशाची प्राप्ती होण्याची शक्यता आहे. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

मकर रास

मकर राशीच्या जातकांसाठी 2026 मध्ये शनि देवाची चाल लाभदायी ठरणार आहे. आवश्यक कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. मोठी मालमत्ता खरेदीचे योग तयार होतायत. कार्यस्थळी सहकर्मी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमच्या नावाची ख्याती वाढणार आहे.

कुंभ रास (Kumbh Zodiac)

कुंभ राशीच्या जातकांसाठी शनि देवाची चाल अनुकूल ठरणार आहे. शनि तुमच्या राशीपासून दुसऱ्या भावात संचरण करणार आहे. त्यामुळे वेळोवेळी आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कामकाजाची स्थिती उत्तम राहील आणि आत्मविश्वास वाढणार आहे. अडकलेले पैसे मिळतील, ज्यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे.

मिथुन रास (Mithun Zodiac)

मिथुन राशीच्या जातकांसाठी शनि देवाची चाल करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ ठरणार आहे. व्यवसाय क्षेत्रात अप्रत्याशित लाभ मिळेल, ज्यामुळे मन आनंदी राहील. नोकरी करणाऱ्यांपैकी काहींचे बदली होऊ शकते. नवीन ठिकाण तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

SCROLL FOR NEXT