Shani Uday 2025 saam tv
राशिभविष्य

Shani Uday 2025: एप्रिल महिन्यात शनीचा होणार उदय; 'या' राशींच्या व्यक्तींची होणार चांदीच चांदी, नोकरीसह होणार धनलाभ

Saturn rise April 2025 : ३१ मार्च २०२५ रोजी मध्यरात्री १२:४३ वाजता शनी मीन राशीत उदयास येणार आहे. गुरुच्या राशीत शनीचा उदय होणं अनेक राशींसाठी शुभ संकेत देणार आहे. काहींना मोठे आर्थिक लाभ मिळू शकतात, तर काही राशींसाठी हा काळ आव्हानात्मक ठरू शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

जेव्हा न्यायाचे देवता शनिदेव यांच्या राशीमध्ये किंवा स्थितीमध्ये बदल होतो तेव्हा त्याचा परिणाम १२ राशींवर दिसून येतो. काही राशींना शनीच्या गोचरचा फायदा होतो, तर काही राशींना सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असते. यावेळी शनि कुंभ राशीत अस्त स्थितीत आहे. मात्र येत्या काळात त्याचा उदय होणार आहे.

३१ मार्च २०२५ रोजी रात्री १२:४३ वाजता शनी मीन राशीत उदयाला येणार आहे. गुरु राशीत शनीचा उदय झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना खूप फायदे होणार आहेत. तर काही राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. मीन राशीत शनीच्या उदयामुळे कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो ते पाहूयात.

मेष रास

या राशीच्या बाराव्या घरात शनि ग्रहाचा उदय होणार आहे. या राशीच्या लोकांच्या जीवनात सुरू असलेल्या समस्या संपू शकतात. नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकणार आहे. या काळात तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. तुम्ही परदेशात चांगले पैसे कमवू शकाल. जीवनात आनंद आणि शांती राहणार आहे. वडिलांसोबत सुरू असलेले मतभेद संपुष्टात येतील.

मिथुन रास

या राशीच्या लोकांसाठीही शनीचा उदय फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांच्या व्यावसायिक जीवनात खूप चांगला परिणाम दिसून येणार आहे. तुम्ही करत असलेल्या कामात प्रचंड यश मिळवू शकता. परदेश प्रवासाचे मार्गही खुले होण्याची शक्यता आहे. व्यवसायात तुम्हाला भरपूर नफा मिळू शकेल.

कर्क रास

या राशीच्या लोकांसाठीही शनीचा उदय खूप फायदेशीर ठरू शकतो. तुमच्या आयुष्यात फक्त आनंदच येणार आहे. नवव्या घरात शनीचा उदय झाल्यामुळे, तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. तुम्ही पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लोक देखील यश मिळवू शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actors: अभिनेता विशाल अन् अक्षयाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Protein Breakfast Recipe: सतत भूक लागतेय? मग नाश्त्यात करा या 4 पदार्थांचा समावेश, सततची भूक होईल गायब

Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates : लातूरमध्ये काँग्रेसला धक्का, भाजप-शिंदेंच्या शिवसेनेकडे आघाडी

ZP Election Result: कोल्हापुरात सतेज पाटलांना धक्का, महिला कार्यकर्त्यांनी केळी दाखवून डिवचलं

Womens Hairstyles: महिलांसाठी 5 ट्रेंडी हेअरकट, प्रत्येक लूकवर शोभून दिसतील

SCROLL FOR NEXT