Shani Gochar Saam Tv
राशिभविष्य

Shani Margi 2024: दिवाळीनंतर शनीच्या स्थितीत होणार बदल; संपत्ती वाढीसह या राशींना मिळणार अफाट पैसा

Shani Margi 2024: 15 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7.51 वाजता शनी थेट कुंभ राशीत मार्गी होणार आहे. शनीच्या या हालचालीमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे, ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये नऊ ग्रहांमध्ये शनी ग्रहाला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. एक राशी चक्र पूर्ण करण्यासाठी शनी देवाला सुमारे 30 वर्षे लागतात. शनिला कर्माचा दाता आणि न्याय देवता म्हणतात. याचं कारण म्हणजे शनी व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो.

सध्या शनी त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत आहे. सध्या ते वक्री अवस्थेत आहे. मात्र दिवाळीनंतर म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात तो मार्गस्थ होणार आहे. शनीची मार्गी चाल काही राशींसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. पंचांगानुसार 15 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7.51 वाजता शनी थेट कुंभ राशीत मार्गी होणार आहे. शनीच्या या हालचालीमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे, ते पाहूयात.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी शनीचं मार्गी होणं खूप फायदेशीर ठरू शकते. या काळात परिस्थितीत दीर्घकाळ प्रलंबित काम पूर्ण होऊ शकतात. तुमच्या कामाचा विचार करून तुम्हाला बढती मिळू शकणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करून तुम्हाला लाभ मिळू शकणार आहे. तुम्ही धैर्य आणि आत्मविश्वासात झपाट्याने वाढ पाहू शकता. दीर्घकाळ चाललेल्या आरोग्याच्या समस्या आता कमी होतील. नोकरदार वर्गातील लोकांचे प्रोमोशन आणि पगार वाढ होणार आहे.

कन्या रास

शनी मार्ग्रस्थ झाल्याने अनावश्यक खर्चाला आतापासूनच आळा बसू शकणार आहे. तुमच्या कामाचा विचार करता तुमच्यावर काही मोठी जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. तुम्हाला नवीन आणि महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार आहे. या काळात आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकणार आहात.

वृषभ रास

शनीची मार्गी चाल या राशींच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. तुम्हाला नोकरीच्या अनेक संधी मिळू शकणार आहे. प्रत्येक कामात यश आणि कुटुंबासाठी आर्थिक स्थिती सुधारण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होणार आहात. व्यवसायातही तुम्हाला भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला खूप चांगले फायदे मिळू शकणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT