Horoscope  Saam tv
राशिभविष्य

Horoscope: जुळून येती रेशीमगाठी!नात्यातील अडचणी होतील दूर; 'या' राशींसाठी आहे आनंदाचा दिवस

Saturday Horoscope: दैनंदिन राशिभविष्य तुम्हाला भविष्यातील घटनांचा अंदाज घेण्यास मदत करू शकते. जर शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल हे जाणून घ्यायचे असेल, वाचा राशिभविष्य

Anjali Potdar

शनिवारी,६ डिसेंबर २०२५,मार्गशीर्ष कृष्णपक्ष.

तिथी-द्वितीया २१|२६

रास- मिथुन

नक्षत्र-मृग ०८|४९

आर्द्रा ३०|१४

योग-शुभयोग

करण-तैतिल

दिनविशेष-चांगला दिवस

मेष

छोट्या प्रवासाच्या दृष्टीने दिवस बोलका आहे. जवळच्या व्यक्तींबरोबर प्रवास होतील. काही गोष्टी आणि निर्णय हे धाडसी असतील. प्रवासातून फायदा हे संभवतो आहे. महत्त्वाचे पत्र व्यवहार होतील.

वृषभ

एखाद्या नाते जपण्यासाठी काही वेळेला आटापिटा करावा लागतो. आज कुटुंबीयांच्या कडून लाभ मिळण्याचा संभव आहे.पैसा खेळता राहील. वारसा हक्काचे निर्णय असतील तर आज ते तुमच्या बाजूने लागतील.

मिथुन

बोल घेवडेपणा ही आपल्या राशीची खासियत आहे .आज स्वतः पुढाकार घेऊन अनेक ठिकाणी कार्य कराल तब्येतही चांगली राहील. मन आनंदी आणि आशावादी ठेवण्यासाठी प्रयत्न करत रहाल.

कर्क

अति साधेपण आणि भावनिक गुंतवणूक ही दरवेळी चांगली नसते. हे लक्षात घ्या. नको त्या ठिकाणी मन अडकणे त्रासदायक ठरेल. प्रेमामध्ये अपयश संभवते आहे. कटकटींची साखळी जोडली जाईल.

सिंह

सामाजिक क्षेत्रामध्ये आज आपली उठबस होईल. महत्त्वाच्या राजकारणी व्यक्तीबद्दल बरोबर किंवा सरकारी अधिकाऱ्यांवर महत्त्वाच्या मुलाखती होतील. ज्याचा आपल्या कामाला वेग येण्यासाठी विशेष फायदा होईल.

कन्या

कर्माचे फळ हे प्रत्येक व्यक्तीला मिळते. आज आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आपल्याला प्रगती रूपे भेटणार आहे. करिअरच्या ठिकाणी आपली पात्रता चोखाळून निघेल. योग्य ते प्रशस्तीपत्र वरिष्ठ व्यक्तीकडून मिळेल.

तूळ

लक्ष्मीची कृपा आणि वरदहस्त आज आपल्यावर विशेष राहणार आहे. अनेक दिवस पैशामुळे अडलेल्या गोष्टी आज करायला हरकत नाहीत. भाग्य काहीतरी वेगळे चांगले आपल्याला दान देणार आहे. अर्थात आपणही आपली मानसिकता सकारात्मक ठेवावी.

वृश्चिक

गूढ शास्त्राविषयी विशेष कल वाढेल. ज्योतिष विषयीचा विशेष आज शोध घ्याल. अचानक मिळणाऱ्या पैशाच्या मागे आज धावून अडचणी वाढवून घेऊ नका. वाहनांपासून सावध राहा.

धनु

"जुळून येती रेशीमगाठी" असा छानसा दिवस आहे. संसारातील आनंद फुलेल.एकमेकांच्या सहकार्याने नवीन स्वप्ने रंगवाल. कामाच्या ठिकाणी सुद्धा "दे धडक बेधडक" असा दिवस आहे.

मकर

आपल्या राशीला पाचवीला पुजलेले कष्ट आणि कटकटी आहेतच. यालाच सर्वस्व मानावे लागेल. आज या गोष्टींचा नि:पात करून पुढे जावे लागेल. शत्रूवर मात कराल. नोकर चाकारांपासून मात्र सावध रहा.

कुंभ

अभ्यासामध्ये विशेष संशोधनात्मक गोष्ट होईल. आपली प्रज्ञा वृत्ती वाढेल. विद्यार्थ्यांना दिवस चांगला आहे. तरुणांना प्रेमात यश मिळेल. संसारी लोकांना धनात फायदा होईल. ज्येष्ठ लोकांना उपासनेत गती मिळेल. अजून काय हवे? दिवस चांगला आहे.

मीन

जे ठरवले आहेत तशीच नियोजनबद्ध कामे आज पार पडतील. घरी पाहुण्यांची ऊठबस राहील. एखादे धार्मिक कार्य घरी होण्याची दाट शक्यता आहे.अर्थातच सकारात्मक वातावरणात दिवस जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanda Poha Recipe: मऊ आणि मोकळे कांदा पोहे बनवण्यासाठी 'या' 5 सोप्या टिप्स नक्की लक्षात ठेवा

HSC Hall Ticket: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, हॉल तिकिटाबाबत मोठी अपडेट समोर

धक्कादायक! भाजप नेता स्टेजवर चढताना धाडकन तोंडावर आपटला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नेत्यांच्या सभांना वेग

Somatic Yoga Benefits: पाठदुखी आणि सांधेदुखीवर रामबाण उपाय; घरच्या घरी करा सोमॅटिक योगा, ही आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT