Horoscope Today in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : या राशींच्या व्यक्तींनी आज कोणतीही रिस्क घेणं टाळा, अन्यथा नको त्या गोष्टीत फसतील पाय

Anjali Potdar

आजचे पंचांग - सोमवार ७ ऑक्टोबर २०२४, अश्विन शुक्लपक्ष, ललिता पंचमी. तिथी-चतुर्थी ०९|४८. रास-वृश्चिक. नक्षत्र-अनुराधा.योग-प्रीतीयोग. करण-बवकरण. दिनविशेष-१० नं. चांगला

मेष - खूपदा एखादा दिवस इकडे आड तिकडे विहीर अशा संभ्रमित अवस्थेत जातो. इतरांसाठी चांगले वागावे तर कामाचा ताण वाढतो आणि नाही तर आपल्याच नुकसानीची शक्यता असते. त्यामुळे आज योग्य निर्णय घेऊन पुढे चला.

वृषभ - दलालीचे व्यवसाय, मध्यस्थी मधून होणारा फायदा यांच्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. कामासाठी काही मोठे बेत आखाल आणि लांबचे प्रवास होतील कामे मार्गी लागतील.

मिथुन - अडीअडचणीला आपलेच लोक मदतीला येतात. आपल्या स्वभावाचा हा गुण अनेकांना माहिती आहे. इतरांना सांभाळून घेता आपण. काही गोष्टी आज त्रासदायक ठरतील पण इतरांच्या मदतीने सहज बाहेर पडाल. आज कोणतीही मोठी रिस्क नको.

कर्क - आज ललिता पंचमी देवी व शिव उपासना फलदायी ठरणार आहे. घेतलेले काम तडीस जाईल आनंद वार्ता कानी येतील. अनेक सुसंधी कामाच्या बाबतीत मिळतील. त्याचे मुक्तहस्ते स्वागत करा.

सिंह - कोणाचा तरी वरदहस्त आज आपल्या कामाच्या बाबतीत मिळणार आहे. जुने संबंध आणि ओळखी मधून नवीन कामे मिळतील. नवे संबंध प्रस्थापित होतील. राजकारण यामध्ये यश आहे. हाती पैसा खेळेल.

कन्या - आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. बाकीच्या दृष्टीने दिवस चांगला असेल. शेजाऱ्यांच्या सहकार्याने अडचणीतून तरुण जाल मित्रांबरोबर स्नेहभोजनाचे योग आहेत.

तूळ - परिस्थिती आणि मनस्थिती दोन्हीही आज जरा त्रासदायक वाटत आहेत. खर्चाला आळा राहणार नाही. खर्च वाढेल. नको त्या गोष्टीत पाय फसण्याची शक्यता आहे.

वृश्चिक- स्वतःचा आत्मविश्वास आज वाढीस लागेल. नवीन जबाबदाऱ्या येतील आणि त्या योग्य रीतीने पूर्ण कराल .आपला सल्ला इतरांना मोलाचा ठरेल.

धनु - मनाची संभ्रमित अवस्था टाळा. पैशाचा दृष्टीने योग्य निर्णय घ्या. वडीलोपार्जित प्रॉपर्टी विषयी आपल्याला आज निश्चित फायदा होईल. गुंतवणुकीच्या दृष्टीने दिवस चांगला.

मकर - जुन्या घरासाठी त्याच्यावर पैसा खर्च होण्याचा आज दिवस आहे. थोडी मेहनत वाढेल पण सर्व कामे मनासारखी घडताना दिसत आहे.

कुंभ - शेतीच्या कामांमध्ये प्रगती होईल. मालाला योग्य उठाव येईल. त्यामुळे मनामध्ये आनंदाच्या लहरी असतील. केलेल्या कामात सुयश मिळण्याचा आजचा दिवस आहे.

मीन - दत्त उपासना फायद्याची ठरेल.शेअर्समधील गुंतवण करायला हरकत नाही. याबाबतीत आपला सल्ला इतरांना पटेल. कलाक्षेत्रामध्ये प्रगती होईल. ललिता पंचमी विशेष उपासना करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : 'या' व्यक्तींसाठी अंजीर फारच घातक; एक घास खाताच उद्भवतात गंभीर समस्या

Suryakumar Yadav: काही ठिकाणी सुधारणा करणं...; विजयानंतर काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

Marathi News Live Updates : पुण्यात आज पार पडणार मनसे ची पश्चिम महाराष्ट्राची विभागीय बैठक

Nashik News : महादेव मंदिरातील दानपेटी फोडली; रक्कम घेऊन चोरटा पसार, नाशिकच्या शिवाजीनगर मधील घटना

DRDO Job: DRDO मध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी; 'या' पदांसाठी निघाली भरती; पात्रता अन् अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

SCROLL FOR NEXT