Horoscope Today in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : आजचे राशीभविष्य, या राशींना प्रेमात मिळणार यश; आज सापडणार हक्काचा जोडीदार

Anjali Potdar

दैनिक पंचांग - सोमवार १४ ऑक्टोबर २०२४. अश्विन शुक्लपक्ष. भागवत एकादशी. तिथी-एकादशी ०६|४२. द्वादशी २७|४३. रास-कुंभ. नक्षत्र-शततारका. योग-गंड करण-विष्टीकरण ०६|४२. बवकरण १७|१६. दिनविशेष-क्षयतिथी.

मेष - आपल्या राशीचे काही दोष म्हणजे, मनाने खूप करता पण बोलून घालवता. आज मात्र या गोष्टी आपण टाळल्यात तर अनेक लाभ पदरात पडण्याचा दिवस आहे. मित्र मैत्रिणी मध्ये हसत खेळत संध्याकाळ राहील.

वृषभ - अनेकांसाठी करिअरच्या नवीन वाटा आणि दालने खुले होतील. स्वतःवरचा विश्वास वाढवा मोठ्यांचा मार्गदर्शनाप्रमाणे आपण गेलात तर यश नक्की मिळणार आहे.

मिथुन - भाग्यकारक घटना घडण्याचा आजचा दिवस आहे. तीर्थक्षेत्रे, मोठ्या मंदिरात भेटीचे योग आहेत. आज एकादशीच्या दिवशी दानधर्मामध्ये स्वतःला गुंतवल्यास शांती मिळेल आणि प्रगती होईल.

कर्क - आपल्या स्वभावाचा इतरांना फायदा घ्यायला देऊ नका. काही वेळेला खंबीरपणे घेतलेले निर्णय हेच बरे पडतात. आपल्याला वाईटपणा आला तरी चालेल पण चुकीच्या मार्गावर आज मार्गक्रमण नको.

सिंह - जोडीदाराबरोबर तू तू मैं मैं असली तरी सुद्धा आज दोघे काही निर्णय घ्याल आणि संसारिक गोष्टी पथावर येतील. व्यवसायामध्ये वृद्धी दिसत आहे. कोर्टाचे निकाल सकारात्मक लागतील.

कन्या - पोटाची दुखणे वाढते राहील.बाहेरचे पाणी आणि जड पदार्थ खाण्यावर बंधन ठेवा. नको असलेल्या आजारपणाच्या कटकटी मागे लागतील. नाहक पैसा सुद्धा खर्च होईल.

तूळ - प्रेमामध्ये रंग बहरतील. कलाक्षेत्रामध्ये फायदा आहे. योग्य जोडीदाराच्या शोधात असाल तर आज त्याला पूर्णविराम मिळेल. हक्काचा जोडीदार नक्की मिळेल. देवी उपासना करा.

वृश्चिक - घरामध्ये काही डागडुजी किंवा नव्या गोष्टींसाठी पैसा खर्च होईल. असावे घरकुल आपले छान ही संकल्पना आपल्यासाठी आज चपखल आहे. सुंदर घरासाठी विशेष कष्ट घ्याल. आनंदी दिवस आहे.

धनु - छोट्या ठिकाणी पर्यटनाला जाण्याचे आज योग येतील. कदाचित शेजारी आणि जवळचे नातलग यामध्ये असतील. आपल्याला मान दिल्यामुळे हुरूप येईल. सगळ्यांचे नेते पण घ्याल.

मकर - धनाची आवक जावक चांगली राहील. आपला स्वभाव तसा चांगला आहे पण कधी अगदीच अबोला तर कधी दुसऱ्याला मनाला लागते अशा बोलल्यामुळे अडचणीत येता. आज थोडा यावर विचार करून वाणीवर नियंत्रण ठेवा.

कुंभ - आपलाच डामडौल यामध्ये आज मग्न राहाल. खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये काय करायचे आहे याची चावी गवसेल. स्वमग्न राहाल. सृजनशीलता व सकारात्मकता वाढेल.

मीन - आपल्या स्वभावाप्रमाणे द्विधा मनस्थिती टाळा. काही वेळेला योग्य निर्णय घेता आले नाही तर योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे वागा. म्हणजे मनस्ताप टाळता येईल. इतरांना श्रेय बहाल केल्यास कटकटी वाढणार नाहीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : ..अन्यथा संविधान चौकात उठाबशा मारा, काँग्रेस नेत्याचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान

Panchak October 2024: दसऱ्यानंतर सुरु झाला पंचक काळ; 'या' गोष्टी करणं जाणीवपूर्वक टाळा

Air India Bomb Threat: खळबळजनक! एअर इंडियाचे विमान बॉम्बने उडवण्याची धमकी, मुंबई-न्यूयॉर्क फ्लाईट दिल्लीकडे वळवली

Maharashtra Assembly Election : २४ तासात राज्यात आचारसंहिता लागणार, कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होणार

Beauty Skin Tips : चेहऱ्यावरील तेज मोत्यासारखं चमकवेल हा हर्बल चहा; एक घोट घेताच दिसेल जादू

SCROLL FOR NEXT