Daily Horoscope Today Today Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya : या राशींच्या व्यक्तींना सापडणार योग्य दिशा, भाग्य राहणार दारात उभे; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 27 September 2024 : दैनिक पंचांग वार शुक्रवार. २७ सप्टेंबर २०२४. भाद्रपद कृष्णपक्ष. एकादशी श्राध्द. मेष ते मीन राशीच्या लोकांचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या एका क्लिकवर...

Anjali Potdar

आजचे पंचांग - वार शुक्रवार. २७ सप्टेंबर २०२४. भाद्रपद कृष्णपक्ष. एकादशी श्राध्द. गजगौरी व्रत (हादगा/भोंडला). तिथी-दशमी १३|२१ पर्यंत नं. एकादशी. रास-कर्क. नक्षत्र-पुष्य. योग-शिवयोग. करण-विष्टिकरण. दिनविशेष-१३ नं. चांगला

मेष - नवीन काहीतरी व्यवसायात डील होण्याची आज शक्यता आहे. मातृ सुखाच्या दृष्टीने दिवस छान आहे. चांगल्या बातम्या कानावर येईल. घरामध्ये वातावरण आनंदी असेल.

वृषभ - एक वेगळी ऊर्जा आज जाणवेल. आपण केलेल्या कामाचे पुरेपूर श्रेय आपल्याला मिळेल. पर्यटनाचे योग आहेत इतरांच्या मनात आपल्याविषयी आदर निर्माण होईल.

मिथुन- गुंतवणुकीच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. मोठ्या मुदतीची गुंतवणूक आज करा. पैशाची आवक जावक चांगली राहील. दिवस सकारात्मक असेल.

कर्क- मनाच्या उंच भराऱ्या आज खऱ्या अर्थाने पूर्ण होतील. मनाप्रमाणे गोष्टी झाल्यामुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन ऊर्जावान असेल. आपल्यात चांगले बदल घडतील. योग्य दिशा मिळतील.

सिंह - थोड्या अडचणी वाढण्याचा आजचा दिवस दिसतो आहे. राजकारणातील लोकांच्या ओळखीमुळे या अडचणीतून तुम्ही सुटाल. पैशाशी निगडित गोष्टींचे व्यवहार करताना चार वेळा विचार करा.

कन्या - मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर स्नेहभोजनाचे योग आहेत. सून-जावयांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित होतील. आपल्या स्वभावाप्रमाणे आपले उमदे आणि खेळीमेळीचे वातावरण तुम्ही ठेवाल.

तूळ - किरकोळ काम करणारे, मध्यस्थी, विक्रेते यांच्यासाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे. जितके प्रवास कराल, फिराल, लोकांशी परिचय कराल तेवढी आपल्या व्यवसायाची वृद्धी होईल हे लक्षात ठेवा.

वृश्चिक- काही गोष्टी न बोलता तुम्ही करता हा तुमचा स्वभाव आहे. सोसण्याची क्षमता सुध्दा अधिक आहे. आपल्या कष्टाला आज सार्थ अशा घटना घडणार आहेत. केलेल्या आतापर्यंतच्या कामाचे चीज होईल. भाग्य दारी उभे राहील.

धनु - आपल्या विषयी अनेकांच्या मनात आज कटूता निर्माण होईल. आपण करत असलेल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करण्याचा बरेच जण प्रयत्न करतील. आपण मात्र मनाने खंबीर राहा आणि नेटाने याचा सामना करा.

मकर - जोडीदारापासून सुखाचा दिवस आहे तुम्हाला तुमचा जोडीदार समजून घेईल काही नवीन बेत दोघे मिळून आखाल जे आनंद आणि सुखामध्ये भर घालणारे असतील. कोर्टाचे निकाल मनाप्रमाणे लागतील.

कुंभ - पोटाची दुखणी डोके वर काढतील. तब्येतीपासून स्वतःची काळजी घ्या. कनिष्ठांकडून उगाचच अपमानास्पद वागणूक आज आपल्याला दिली जाईल. आपले वर्तन सांभाळा.

मीन - प्रेमासाठी सुंदर दिवस आहे. कोणाला मागणी घालायची असेल, कोणाला आपलंसं करायचं असेल तर आजच्या दिवसाच्या संधीचे सोने करा. आपली सकारात्मकता अशीच ठेवा. प्रेमात गुलाबी रंग भराल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत इमारतीला आग, घाबरलेल्या दोघांनी खिडकीतून मारली उडी, सुदैवानं....| VIDEO

Maharashtra Live News Update : जनसुरक्षा कायदा रद्द करण्याचा मागणीसाठी राज्यभरात आंदोलन करण्यात आले

Palak Pakoda Recipe : गरमागरम चहा अन् कुरकुरीत पालक भजी, पावसाळ्यात चटपटीत नाश्ता

High Court Notice To BCCI: आईशप्पथ, खेळाडूंनी फस्त केली ३५ लाखांची केळी, बीसीसीआयचा बीपी वाढला; हायकोर्ट अ‍ॅक्शन मोडमध्ये

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर खिळे कोणी ठोकले? MSRDC नं दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT