Grah Gochar saam tv
राशिभविष्य

Grah Gochar: ८ फेब्रुवारीला शनी-बुधामुळे तयार होणार दुर्मिळ राजयोग; द्विद्वादश योगामुळे प्रगतीची दारं उघडणार

Grah Gochar: ग्रहांच्या विशेष स्थितींमुळे निर्माण होणाऱ्या योगांमध्ये द्विद्वादश हा अत्यंत शुभ मानला जातो. बुध आणि शनि एकमेकांपासून केवळ 30 अंशांच्या अंतरावर असतील तेव्हा हा योग तयार होतो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रातील सर्व 9 ग्रह 12 राशी आणि 27 नक्षत्रांमध्ये भ्रमण करतात. यावेळी जेव्हा ते गोचर करतात तेव्हा त्यांचा इतर ग्रहांशी संयोग होतो. यापैकी काही संयोजनांचे सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतात. असाच एक योग म्हणजे बुध आणि शनीचा द्विद्वादश योग. ग्रहांच्या विशेष स्थितींमुळे निर्माण होणाऱ्या योगांमध्ये द्विद्वादश हा अत्यंत शुभ मानला जातो.

बुध हा बुद्धिमत्ता, वाणी, व्यवसाय आणि संवादाचा कारक मानला जातो, तर शनी कृती, शिस्त आणि स्थिरतेचा कारक आहे. शनिवारी 8 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3:25 वाजता बुध आणि शनि व्दिद्वादश योग तयार करणार आहे. ज्योतिष शास्त्राच्या गणनेनुसार, बुध आणि शनि एकमेकांपासून केवळ 30 अंशांच्या अंतरावर असतील तेव्हा हा योग तयार होतो.

राशींवर कसा होणार परिणाम?

बुध-शनिचा द्विद्वादश योग जीवनाच्या यश प्रदान करतो. हा योग व्यक्तीला पद्धतशीर आणि तार्किक दृष्टिकोन स्वीकारण्यास मदत करतो. बुध आणि शनीच्या या संयोगामुळे 8 फेब्रुवारीला निर्माण होणारा सर्व राशींवर परिणाम होणार आहे. यावेळी काही राशींचं आयुष्य अचानक बदलणार आहे. जाणून घेऊया यावेळी कोणत्या राशींचं आयुष्य बदलणार आहे.

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी हा योग करिअर आणि आर्थिक लाभाचे नवीन दरवाजे उघडणारा सिद्ध होणार आहे. उच्च अधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळणार आहे. नवीन भागीदार मिळू शकतात आणि व्यवसायाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून मोठा नफा मिळण्याची चिन्हं आहेत.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा योग कौटुंबिक जीवनात आणि आर्थिक परिस्थितीत स्थिरता आणेल. कौटुंबिक वाद मिटतील आणि नात्यात सुसंवाद वाढेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी देखील हा काळ शुभ आहे. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल राहणार आहे.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी हा योग नवीन सुरुवात आणि मोठ्या बदलांचा संकेत असणार आहे. व्यवसायात विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. प्रदीर्घ प्रलंबित प्रकल्प पूर्ण होतील आणि नवीन प्रकल्प सुरू होणार आहे. कुटुंबात लग्न किंवा नवीन सदस्याच आगमन यासारखी शुभ घटना घडण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा! मुंबई पुण्यासह कोकणात आज 'रेड अलर्ट; मुसळधार पावसाचा इशारा

Chia Seeds vs Saunf Water: चिया सीड्स की बडीशेपचे पाणी; वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय ठरेल बेस्ट?

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; जिल्हाधिकाऱ्यांसह बड्या अधिकार्‍यांचे अधिकार बदलले

Maharashtra News Live Update: मुंबईसह पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट

शाळेबाहेर 'स्टिंग' विकण्यास बंदी, अन्न-औषध प्रशासन मंत्र्यांची विधानसभेत घोषणा

SCROLL FOR NEXT