Budhaditya and Lakshmi Narayan Yog saam tv
राशिभविष्य

Mahalaxmi Rajyog 2025: 100 वर्षांनी दिवाळीला बनणार पॉवरफुल महालक्ष्मी योग; 'या' राशींच्या आयुष्यात येणार धन-संपत्ती

Mahalakshmi Rajyog Diwali: दिवाळीचा (Diwali) सण म्हणजे लक्ष्मी देवीचे आगमन आणि नवीन सुरुवातीचा उत्सव. हिंदू धर्मात दिवाळीला धन आणि समृद्धीसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. यंदाची दिवाळी अनेक राशींसाठी प्रचंड भाग्यशाली ठरणार आहे

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार यावर्षी दिवाळीचा सण २० ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. त्याचबरोबर २१ ऑक्टोबरला चंद्र आणि मंगळ यांच्या युतीमुळे तूळ राशीत एक विशेष ‘महालक्ष्मी राजयोग’ निर्माण होणार आहे.

या योगामुळे काही राशींचं भाग्य उजळणार असून आर्थिक प्रगतीची मोठी संधी मिळू शकते. यावेळी काही काही राशींच्या व्यक्तींच्या संपत्तीत वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे नशिबाची साथ या काळात काही राशींना विशेष मिळणार आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

कर्क रास

कर्क राशीच्या व्यक्तींना महालक्ष्मी राजयोग अत्यंत शुभ ठरू शकणार आहे. या काळात तुमच्या सुखसोयींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्ही नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. कुटुंबात आनंदाचे क्षण येणार आहेत. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल. प्रमोशन किंवा वेतनवाढीचेही योग दिसत आहेत.

मकर रास

मकर राशीसाठी महालक्ष्मी राजयोग अत्यंत फलदायी ठरू शकणार आहे. त्यामुळे नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीची चांगली संधी मिळू शकते. या काळात योग्य संधी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कार्यस्थळी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. शेअर बाजार, संपत्ती किंवा गुंतवणुकीशी संबंधित निर्णय या काळात लाभदायक ठरतील.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठीही हा महालक्ष्मी राजयोग शुभ संकेत देणारा आहे. या काळात अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळणार आहे. व्यापाऱ्यांना अडकलेलं पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. धन कमावण्यासाठी नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : वृषभसह 'या' ३ राशींना नशिबाची साथ; शनिवार ठरणार आनंदाचा, प्रत्येक कामात मिळणार यश

एक कप चहामध्ये किती साखर घालावी? जाणून घ्या योग्य प्रमाण

Egg Yolk Benefits: अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने वजन वाढतं का?

Rava Idli Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा मऊ आणि स्वादिष्ट रवा इडली; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: पुण्यात विषारी दारूने घेतले १८ जणांचे बळी; बाहेरून 'गावठी' आणून 'मिथेनॉल' मिसळले

SCROLL FOR NEXT