Budhaditya Rajyog 2025 saam tv
राशिभविष्य

Budhaditya Rajyog: होळीमध्ये गुरुच्या राशीत बनणार शक्तीशाली बुधादित्य राजयोग; 'या' राशींना करियरमध्ये मिळणार चांगली संधी

Budhaditya Rajyog 2025: येत्या काळात ग्रहांचा राजकुमार बुध याच्याशी सूर्याची युती होऊन शक्तिशाली बुधादित्य योग निर्माण होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम मिळणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

सूर्यमालेतील नवग्रहांमध्ये प्रत्येक ग्रहाला एक खास महत्त्व देण्यात आलंय. यामध्ये ग्रहांचा राजा सूर्याला विशेष महत्त्व आहे. ज्यावेळी सूर्य त्याच्या राशीत बदल करतो किंवा दुसऱ्या ग्रहाशी युती करतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होत असतो.

सूर्य दर महिन्याला राशी बदलतो. यामुळे एक राशीचक्र पूर्ण होण्यास 1 वर्षाचा कालावधी लागतो. या काळात सूर्याची इतर ग्रहांशी युती देखील होते. येत्या काळात ग्रहांचा राजकुमार बुध याच्याशी सूर्याची युती होऊन शक्तिशाली बुधादित्य योग निर्माण होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम मिळणार आहेत.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार बुध 27 फेब्रुवारीला मीन राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी सूर्य देखील 14 मार्च रोजी मीन राशीत येणार आहे. ज्यामुळे 14 मार्च रोजी दोन्ही ग्रहांच्या संयोगाने बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. या काळात कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

वृषभ रास

या राशीच्या अकराव्या भावात बुधादित्य राजयोग तयार होतोय. कुटुंबासमवेत चांगला वेळ व्यतीत होईल. आयुष्यात आनंदाची थाप येऊ शकते. करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. तुम्हाला व्यवसायाच्या क्षेत्रातही भरपूर फायदे मिळू शकतात. पैशांची बचत करण्यात यशस्वी होऊ शकता.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग खूप फायदेशीर ठरू शकता. या राशीच्या लोकांना वडिलोपार्जित मालमत्तेच्या माध्यमातून अनपेक्षित धनलाभ मिळू शकणार आहे. पण थोडी सावध गिरी बाळगण्याची गरज. जर तुम्ही पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर या काळात ते करणे फायद्याचे ठरेल.

तूळ रास

या राशीच्या नवव्या भावात बुधादित्य योग तयार होत आहे. दीर्घकाळापासून ज्या कामात काम करत आहात ते यशस्वी होऊ शकते. त्याचबरोबर कुटुंबासमवेत चांगला वेळ व्यतीत होईल. व्यवसायात ही यश मिळू शकते. चांगले पैसे मिळू शकणार आहेत. कामाच्या ठिकाणी चांगले पैसे मिळू शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT