Weekly Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Weekly Horoscope: या राशीच्या व्यक्तींना नोकरी-व्यवसायात मनासारखं यश मिळेल, जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope: हा आठवडा अनेक राशींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या आठवड्यात अनेक ग्रहांची स्थिती तुमच्या जीवनाच्या विविध पैलूंवर परिणाम करणार आहे. जाणून घ्या कसं आहे तुमचं या आठवड्याचं राशी भविष्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मेष

धनस्थानी होणारी अमावस्या अनपेक्षित खर्च करणारी राहील. स्पष्ट बोलणे टाळावे. कुटुंबात वादविवाद संभवतात. धार्मिक, मंगल कार्यात सहभाग राहील.

वृषभ

मोठे खर्च पुढील काळात संभवतात. राशीतील बुध-हर्षल युती मूड बदलणारी असेल. उत्स्फूर्त वक्तव्यामुळे कौतुक होईल. कुटुंबात आनंददायी घटना घडेल.

मिथुन

परदेशगमनाची संधी मिळेल. उत्तरार्धात चंद्र-गुरू युतीमुळे मानसिक स्थिती चांगली राहील. विद्यार्थांना अपेक्षित यश मिळेल. नवीन मित्र-मैत्रिणी भेटतील. मोठे लाभ होतील.

कर्क

जुनी येणी वसूल होईल. नोकरी आणि व्यवसायात मनासारखे बदल होतील. सामाजिक, राजकीय क्षेत्रांत मोठे यश मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होतील.

सिंह

दशमात होणारी अमावस्या नोकरी व्यवसायात अनपेक्षित बदल घडविणारी राहील. नवीन नोकरी-व्यवसायाची संधी मिळेल. बोलल्यामुळे प्रभाव वाढेल. बदली किंवा प्रमोशन होईल.

कन्या

विद्यार्थ्यांना प्रवेश मिळविण्यात अडथळे येतील. आधुनिक शिक्षणाकडे कल राहील. सामाजिक-राजकीय क्षेत्रात मोठे यश मिळेल. चांगल्या कामांसाठी वरिष्ठांकडून संधी मिळेल.

तूळ

शारीरीक-मानसिक दगदग होईल. कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्यावी लागेल. उत्तरार्धातील चंद्र-गुरू युती दिलासा देणारी राहील. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद मिळेल.

वृश्चिक

वैवाहिक जीवनात मोठ्या घडामोडी घडविणारा कालखंड आहे. जोडीदाराशी मतभेद टाळावेत. मात्र, अष्टमातील चंद्र-गुरू युती मोठे आर्थिक लाभदेणारी राहील.

धनू

हाताखालच्या लोकांकडून मनस्ताप संभवतो. सप्तमातील चंद्र-गुरू युती विवाह इच्छुकांचे विवाह जमविणारी राहील. कोर्टकचेरीच्या कामांमध्ये मोठे यश मिळेल. भागीदारीच्या व्यवसायात फायदा होईल. नवीन घर, वाहन खरेदी होईल.

मकर

आधुनिक शिक्षणाकडे कल राहील. शेअर मार्केटपासून दूर राहावे. षष्टातील चंद्र-गुरू युती हितशत्रूचा त्रास वाढविणारी राहील. या काळात नोकरीमध्ये मोठा बदल संभवतो.

कुंभ

घर, प्रॉपर्टी जागेसंदर्भातील कामे मार्गी लागतील. नोकरीत बदल किंवा बदली संभवते. घरातील वातावरण व मन अस्थिर राहील.

मीन

तृतीय स्थानात होणारी अमावस्या कर्तृत्व, पराक्रम सिद्ध करणारी राहील. मोठे धाडसी निर्णय यशस्वी होतील. चतुर्थातील चंद्र-गुरू युती नवीन घर किंवा वाहन खरेदीसाठी उत्तम राहील.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गट आणि उबाठा गट आमने सामने, स्लिप वाटपावरून वाद

Pani Puri Recipe : घरीच बनवा बाजारात मिळतात तशा टम्म फुगलेल्या पाणीपुरीच्या पुऱ्या, रेसिपी आहे खूपच सोपी

मतदानाच्या आदल्या दिवशीच शिंदे सेनेच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक; तोडफोडही केली, भाजपवर आरोप

Viral Video: चालत्या बाईकवर मारहाण! पत्नीने 27 सेकंदात पतीला १४ वेळा लगावल्या कानाखाली

Municipal Election : मतदानाआधी जिथं-तिथं पैशांचा पाऊस, VIDEO

SCROLL FOR NEXT