Career and business success saam tv
राशिभविष्य

Anant Chaturdashi 2025: विसर्जनाच्या दिवशी गणपती बाप्पा 'या' राशींना करणार मालामाल; अनंत चतुर्दशीला 4 शुभ महासंयोग देणार पैसा

Anant Chaturdashi auspicious day: एकाच वेळी चार दुर्मिळ 'महासंयोग' (शुभ योग) तयार होत आहेत. या योगमुळे भगवान गणपतीसोबतच भगवान विष्णू आणि शनिदेवाचाही आशीर्वाद काही विशिष्ट राशींवर राहील. या महासंयोगामुळे त्यांच्या नशिबाचे दार उघडेल आणि गणपती बाप्पाच्या कृपेने त्यांना मोठा धनलाभ होईल.

Surabhi Jayashree Jagdish

अनंत चतुर्दशीचा दिवस अत्यंत पवित्र आणि खास मानला जातो. याच दिवशी गणपति बाप्पाला सन्मानात निरोप देण्यात येतो. याशिवाय भक्तांच्या जीवनावर तो सुख-समृद्धीचं आशीर्वाद पाडतो.

यंदाच्या वर्षी ६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या दिवशी चार शुभ योगांचा महासंयोग निर्माण होणार आहे. यामध्ये रवि योग, सुकर्मा योग, धनिष्ठा नक्षत्र आणि शतभिषा नक्षत्र यांचा समावेश आहे. या मंगलयोगांच्या छत्र छायेखाली बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. याशिवाय त्याचं फळ काही राशींच्या लोकांना विशेष लाभदायी ठरणार आहे.

मिथुन (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी अनंत चतुर्दशीचा दिवस अत्यंत शुभ राहणार आहे. या काळात आर्थिक प्रगती होण्याचे योग दिसतात. या काळात धर्म-कर्माची आवड वाढणार आहे. त्याचप्रमाणे वैवाहिक सुख मिळण्याची शक्यता आहे. तसंच कुटुंबासोबत आनंदाचे क्षण अनुभवता येणार आहे. एकूणच घरात सुख-शांती पसरून कामकाजातही वाढ होणार आहे.

कन्या (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठीही हा काळ लाभदायी असणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होण्याची चिन्हं आहेत. काहींना हा काळ वरदानासारखा वाटू शकतो. त्याचप्रमाणे पद, पैसे आणि सन्मान मिळण्याची शक्यता आहे. वैयक्तिक जीवनातही संतोष राहील.

वृश्चिक (Scorpio)

वृश्चिक राशीसाठी नव्या शुभ दिवसांची सुरुवात होण्याची शक्यता आहे. बँकमधील शिल्लक वाढणार आहे. अडकलेला पैसा परत मिळण्याचे योग आहेत. नोकरीत आणि व्यवसायात दोन्ही ठिकाणी हा काळ फायदेशीर राहणार आहे. उत्सव-पूजेत सहभागी होता येणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akkalkot : दिवाळीच्या सुट्ट्यांदरम्यान अक्क्लकोटचं श्री स्वामी मंदिर 20 तास खुलं राहणार | VIDEO

Education Justice : पुण्यात नामांकित कॉलेजने कागद पडताळणीसाठी केला उशीर, तरुणाची ब्रिटनमधली नोकरी गेली, नेमकं काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update : धनंजय मुंडे यांच्या भाषणानंतर करुणा मुंडे यांची प्रतिक्रिया

Bhaubeej Gift: अजून ठरलं नाही बहिणीसाठी गिफ्ट? पाहा भाऊबीजासाठी खास आणि ट्रेंडी गिफ्ट Ideas

Gold Rate: धनत्रयोदशीला सुवर्णनगरीत सोनं स्वस्त; ३००० रुपयांची घसरण, ग्राहकांची गर्दीच गर्दी

SCROLL FOR NEXT