Budh Gochar  saam tv
राशिभविष्य

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

Mercury Transit in Gemini 2026: २९ मे २०२६ रोजी बुध ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार असून या गोचरामुळे काही राशींना करिअर, आर्थिक स्थिती आणि प्रतिष्ठेमध्ये मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या कोणत्या राशींवर बुधाची विशेष कृपा राहणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रहाला बुद्धिमत्ता, तर्क, संवाद, चातुर्य आणि व्यवसाय यांचा घटक मानण्यात येतं. मे २०२६ च्या अखेरीस बुधाचं गोचर होणार आहे. २९ मे २०२६ रोजी बुध वृषभ राशी सोडून स्वतःच्या राशीत म्हणजेच मिथुन राशीत प्रवेश करणार आहे.

ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून बुधाचा स्वतःच्या राशीत प्रवेश अत्यंत शक्तिशाली आणि शुभ मानला जातो. स्वतःच्या राशीत असल्यामुळे बुधाकडून पूर्णपणे सकारात्मक परिणाम मिळणार आहे. या गोचराचा परिणाम सर्व १२ राशींवर होणार आहे. मात्र यावेळी चार राशींना त्यांच्या कारकिर्दी, आर्थिक स्थिती आणि प्रतिष्ठेमध्ये महत्त्वपूर्ण लाभ मिळण्याची शक्यता आहे. या राशी कोणत्या आहेत ते पाहूयात.

मिथुन

बुध हा तुमच्या राशीचा स्वामी आहे आणि हे गोचर तुमच्या राशीच्या पहिल्या घरात आहे. या काळात तुमची विचारशक्ती आणि आकलनशक्ती तीक्ष्ण राहणार आहे. तुम्ही घेतलेले कोणतेही निर्णय तुम्हाला भविष्यात मोठे फायदे मिळवून देतील. कामाच्या ठिकाणी किंवा व्यावसायिक बैठकांमध्ये लोकांवर सहज प्रभाव टाकू शकाल.

कन्या

तुमच्या मेहनतीची कामाच्या ठिकाणी दखल घेतली जाणार आहे. जे लोक बऱ्याच काळापासून चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना या काळात एक चांगली संधी मिळू शकते. या काळात, तुम्हाला तुमच्या वडिलांकडून किंवा वडिलोपार्जित मालमत्तेतून मोठे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी बुधाचं हे गोचर त्यांच्या नवव्या घरात होणार आहे. सरकारी अडथळे किंवा निधीच्या कमतरतेमुळे काही काळापासून थांबलेली कामं आता पूर्ण होणार आहेत. नशिबाची साथ मिळाल्याने तुम्हाला अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. लॉटरी, शेअर बाजार किंवा जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.

Disclaimer : राशीभविष्य ज्योतिषशास्त्राच्या आधारे तयार करण्यात आलं आहे. या माहितीवर आधारित घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

काशी विश्वनाथाच्या कळसाचं सोनं चोरीला? PMO कडे तक्रार,मंदिर प्रशासनानं आरोप फेटाळले

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, या 4 राशींच्या नशीबी आज पैसा; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

16 ऑक्टोबरला सरकारविरोधात CJPचा तिरंगा मोर्चा, कनॉट प्लेसचं 'जंतरमंतर' होणार

Fact Check: व्हॉट्सअॅपवर 'NO' लिहाल अकाऊंटमधील पैसे गमवाल? छोट्याश्या चुकीमुळे कष्टाचे पैसे घालवून बसाल?

SCROLL FOR NEXT