Number 7 in Numerology  Saam TV
राशिभविष्य

Numerology : या तारखेला जन्मलेले व्यक्ती स्वभावाने असतात तापट; एका घावातच संकटाचे करतात दोन तुकडे

Anjali Potdar

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्यात ९, १८, २७ तारखेला झाला आहे, त्यांचा भाग्यांक नऊ आहे. मंगळ ग्रह या नंबरचा कारक आहे. तुमच्यावर मंगळाचा अंमल असल्यामुळे आक्रमकता, प्रतिकार, धाडस, तडफ आणि तत्परता दर्शवते. तुम्ही लढावू वृत्तीचे आहात. नेहमी आक्रमक आणि ध्येयपूर्ती झाल्याशिवाय थांबत नाही.

पूर्णपणे प्रतीकुल परिस्थिती असली तरी तिला तोंड देण्याची किंवा दोन हात करण्याची कुवत तुमच्यात आहे. पराभव ही गोष्ट तुमच्या गावी नसते. जर सैन्यांमध्ये मंगळ लोकांची तुकडी असेल तर एकतर विजय मिळवतील किंवा मृत्यु पत्करण्यात आनंद मिळवतील. तुमच्या बोलण्यामध्ये युक्तिवाद अथवा नाजूकपणा नसतो.

तुमचा उद्देश नेहमी चांगला असतो. तुमचे जोरदार आणि जोशपूर्ण मागणे काही वेळेला अडदांडपणा असायचा गैरसमज केला जाऊ शकतो. शक्यतो दुसऱ्यावर टीका करू नये आणि शब्द काळजीपूर्वक वापरावेत. नाहीतर तुमच्यावरच ते बुमारांग होतील. तुमचा स्वभाव तापट, धाडसी आहे. भावनेचा कळवळा येत नाही.

उद्धटपणा आणि जोरकसपणा सुरुवातीपासून शेवटपर्यंत राहतो. खेळाची, शक्तिकामे, व्यायामाची तुम्हाला आवड आहे. वासनापूर्ती होण्यासाठी कोणत्याही दिव्यामधून जाण्यास तुम्ही तयार आहात. तुमचे लैंगिक भावना तीव्र आणि विरुद्ध लिंगी व्यक्तीकडे आकर्षिल्या जातात. शूर असल्याने भांडणासारख्या कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही.

मित्रांबरोबर आदर आहे. त्यांच्या बाजूने लढण्यास सुद्धा तयार होता. दुबळ्या लोकांबद्दल दया आणि प्रेम असते. मुले आणि प्राणी प्रिय असतात. दुसऱ्यावर दया करण्यात एक सुप्त आनंद मिळतो. आजारी लोकांना बरे करण्याची तुमच्याकडे क्षमता आहे. स्वतःवर ताबा असून क्षमाशिल विचारधारा आहे. मानसिकता चांगली असून कोणत्याही परिस्थितीत ठामपणे उभे राहता.

आपल्या अंकाचे नोकरी व्यवसाय पाहता अनेक व्यवसाय तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. तरीसुद्धा जिथे धैर्य किंवा आक्रमकता आहे जसे की सैनिकी जीवन, सेनेमध्ये मान मरातब, राजकीय क्षेत्रात, पुढारी, व्यावसायिक क्षेत्रात धडपडी वृत्ती, धडाडी असते. उत्तम डॉक्टर, केमिस्ट आणि लोखंडाशी संबंधित व्यवसाय आपण करू शकता.

आपले रोग आणि आजार मुख्यत्वे करून आपल्याला उष्णतेचे रोग आणि आजार होतात. मुळव्याध, ताप या गोष्टींचा त्रास होतो. मूत्रपिंडाचे विकार, मुतखडा, मूत्राशयाचे विकार, घसा आणि फुफ्फुस नलिकेचे आणि स्वर यंत्राचे त्रास संभावतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : पुण्यात आज पार पडणार मनसे ची पश्चिम महाराष्ट्राची विभागीय बैठक

Nashik News : महादेव मंदिरातील दानपेटी फोडली; रक्कम घेऊन चोरटा पसार, नाशिकच्या शिवाजीनगर मधील घटना

DRDO Job: DRDO मध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी; 'या' पदांसाठी निघाली भरती; पात्रता अन् अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

Maharashtra Politics : महायुतीचा गड भेदण्यासाठी पवार-ठाकरेंचं तगडं प्लॅनिंग, शिंदे-भाजप काय तोडगा काढणार?

Harshvardhan Patil: ....म्हणून शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला, हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT