Chandra-Ketu Yuti saam tv
राशिभविष्य

Chandra-Ketu Yuti: चंद्र-केतू्च्या युतीमुळे खुलणार 'या' राशींचं नशीब; नव्या नोकरीसह होणार व्यवसायात प्रगती

Chandra Ketu Yuti 2025: केतू हा अध्यात्म, मोक्ष, वैराग्य आणि तांत्रिक इत्यादींचा नियंत्रक ग्रह मानला जातो. केतू हा सुमारे 18 महिन्यांनंतर त्याच्या राशीत बदल करतो. तर चंद्रदेव अडीच दिवसांत गोचर करतो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. चंद्र आणि राहू हे दोन्ही एकमेकांपासून वेगळे ग्रह आहेत. चंद्र हा भावना, आई, मन आणि मनोबल देणारा मानला जातो. त्याचबरोबर केतू हा अध्यात्म, मोक्ष, वैराग्य आणि तांत्रिक इत्यादींचा नियंत्रक ग्रह मानला जातो. केतू हा सुमारे 18 महिन्यांनंतर त्याच्या राशीत बदल करतो. तर चंद्रदेव अडीच दिवसांत गोचर करतो.

वैदिक पंचांगानुसार, केतू 18 मे 2025 रोजी दुपारी 4.30 वाजता सिंह राशीत गोचर करणार आहे. केतूच्या राशीबदलानंतर काही दिवसांनी चंद्रही सिंह राशीत प्रवेश करणार आहे. यावर्षी चंद्र 1 जून रोजी रात्री 9 वाजून 36 मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे 1 जून 2025 रोजी सिंह राशीत चंद्र आणि केतूची युती होणार आहे.

या दोन्ही ग्रहांची युती काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. तर यावेळी काही राशींना त्यांच्या आयुष्यात सुखाचे क्षण येणार आहेत. यावेळी कोणत्या राशींना चांगले फायदे मिळणार आहेत ते पाहूयात.

मिथुन रास

चंद्र-केतूच्या आगमनामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकू शकणार आहे. पैशाचे नवे स्त्रोत उघडू शकणार आहेत. ज्यामुळे पैशाच्या कमतरतेपासून सुटका होणार आहे. तरुणांना करिअरच्या प्रगतीच्या उत्तम संधी मिळतील. वडिलांशी असलेलं नातं दृढ होणार आहे.

कर्क रास

चंद्र आणि राहूच्या कृपेने कर्क राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीच्या नवीन संधी निर्माण होणार आहे. ज्यामुळे व्यावसायिकांची आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते. लवकरच घरात काही शुभ कार्य होऊ शकतं. तुमच्या डोक्यावर असलेला कामाचा ताण कमी होणार आहे.

धनु रास

मिथुन आणि कर्क व्यतिरिक्त चंद्र आणि केतूच्या युतीचा धनु राशीच्या लोकांवर ही शुभ प्रभाव पडणार आहे. व्यावसायिकांना नवीन प्रकल्पांमध्ये यश मिळेल, ज्यामुळे कामात प्रगती होईल. व्यावसायिकांना धनलाभ होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला इतरांचा चांगलं सहकार्य मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF Rules Payslip : कंपनीच्या पे स्लिपमध्ये PF रक्कम कमी का दिसते? यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या...

Yashasvi Jaiswal : यशस्वी भव! ओव्हलच्या मैदानात जैस्वाल शो, इंग्लंडच्या नाकावर टिचून ठोकलं शतक

Maharashtra Politics : काँग्रेसला राज्यात मोठा झटका! बड्या नेत्याचा उपमुख्यमंत्र्यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Maharashtra Live News Update : यवतमधील आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

Beed News: शाळा बनली कुस्तीचा आखाडा; शिक्षक आणि क्लर्कमध्ये हाणामारी पाहा,VIDEO

SCROLL FOR NEXT