Mercury Rise saam tv
राशिभविष्य

Budh Uday 2024: 12 डिसेंबरला होणार बुध ग्रहाचा उदय; 'या'राशींना मिळणार आकस्मिक धनलाभ, संकटं होणार दूर

Budh Uday 2024: 12 डिसेंबर रोजी सकाळी 6.12 वाजता बुध ग्रहाचा उदय होणार आहे. जाणून घेऊया यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीत बदल करतो. यावेळी बुध ग्रह जवळपास दर महिन्याला त्याच्या राशीत बदल करतो. याशिवाय बुध ग्रह उदय आणि अस्त देखील होतो. बुध ग्रहाला वाणी, कौशल्य, तर्क, यांचं कारक मानलं जातं. बुधाची स्थिती देखील सतत बदलत असते. सध्या बुध वृश्चिक राशीत असून नोव्हेंबरच्या अखेरीस तो या राशीत अस्त झालाय. पूर्ण 13 दिवस बुध सुप्त अवस्थेत राहील. यानंतर बुध ग्रहाचा उदय होणार आहे.

पंचांगानुसार, 12 डिसेंबर रोजी सकाळी 6.12 वाजता बुध ग्रहाचा उदय होणार आहे. बुधाचा उदय होताच ज्या लोकांच्या जीवनात काही समस्या आणेल तर काही लोकांच्या आयुष्यात आनंद घेऊन येणार आहे. जाणून घेऊया यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी बुधाचा उदय लाभदायक ठरू शकणार आहे. संपत्ती आणि कुटुंबाच्या भावनेमुळे अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकणार आहेत. एकाग्रता आणि बौद्धिक क्षमता वाढू शकणार आहे. या काळात तुम्हाला व्यवसायातही भरपूर फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे.

सिंह रास

बुध ग्रहाच्या उदयामुळे या राशीच्या लोकांना भौतिक सुख मिळू शकणार आहे. पैसे कमवण्याचे अनेक मार्ग खुले होऊ शकतात. यावेळी तुमच्या घरात फक्त आनंदच राहणार आहे. योजना आणि धोरणांच्या आधारे तुम्ही भरपूर नफा कमवू शकता. व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबामध्ये एखादं मंगलकार्य घडणार आहे.

वृश्चिक रास

या राशीच्या लोकांना खूप फायदा होऊ शकणार आहे. तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ दिसून येण्याची शक्यता आहे. तुम्हाला नोकरीतही नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायातही भरपूर फायदा होऊ शकतो. शेअर मार्केटमध्ये केलेल्या गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळू शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज्याचा पारा घसरला, पुण्यासह मुंबई गुलाबी थंडीने गारठले

Thane Land Scam: ठाण्यात जमीन घोटाळा; २०० कोटींची जमीन ३ कोटीत लाटली, वडेट्टीवारांचा शिंदेंच्या मंत्र्यावर आरोप

Jupiter Retrograde 2025: 11 नोव्हेंबरपासून 'या' राशींची होणार बल्ले-बल्ले; गुरु वक्री होऊन देणार पैसा

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT