Lakshmi Narayan Rajyog saam tv
राशिभविष्य

Lakshmi Narayan Rajyog: बुध-शुक्राच्या युतीने मालामाल होणार 'या' राशी; घरात अचानक येणार पैसा

Lakshmi Narayan Rajyog: ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग निर्माण होतात. ऑक्टोबर महिन्यामध्ये बुध आणि शुक्राच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग निर्माण होतात. या राजयोगाच्या निर्मितीमुळे सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होतो. येत्या काळात असाच एक राजयोग तयार होणार आहे.

शास्त्रानुसार, ऑक्टोबर महिन्यामध्ये बुध आणि शुक्राच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. तब्बल एका वर्षानंतर तूळ राशीमध्ये लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. या राजयोगामुळे काही राशींचे चांगले दिवस येणार आहेत. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे, हे जाणून घेऊया.

तूळ रास

लक्ष्मी नारायण राजयोग तूळ राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमचं वैवाहिक जीवन चांगलं राहणार आहे. तुम्हाला मनाजोग्या ठिकाणी नोकरी मिळणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मेहनतीचं फळ मिळणार आहे. समाजात मान मिळणार आहे.

कुंभ रास

बुध आणि शुक्राच्या युतीने तयार झालेला लक्ष्मी नारायण योग तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला नशीबाची साथ मिळणार आहे. तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकता. परदेशात फिरायला जाण्याची तुम्हाला संधी आहे.

मकर रास

लक्ष्मी नारायण राजयोग मकर राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला नवीन ठिकाणी नोकरी मिळणार आहे. तुमच्या घरात अचानक कुठूनतरी पैसा येणार आहे. तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होणार आहे. व्यापारात तुम्हाला लाभ मिळू शकतो.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism : विकेंड गेटवेसाठी उत्तम ठिकाणं महाराष्ट्रातली प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणं Top 5 ठिकाणं

Manoj Jarange: बॅनरमुळे संघर्ष पेटणार; मुंबईत जरांगेंना डिवचणारी बॅनरबाजी

Chandrapur Accident: भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षाचालकासह ६ जणांचा जागीच मृत्यू

Dowry : आणखी एक हुंडाबळी! सासरच्यांनी हुंड्यापायी विवाहितेला पाजलं अ‍ॅसिड, महिलेचा दुर्दैवी अंत

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात शेगाव-सोनाळा मार्गावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक

SCROLL FOR NEXT