Navpancham Rajyog saam tv
राशिभविष्य

Navpancham Rajyog: बुध-युरेनसने पहाटे तयार केला नवपंचम राजयोग; 'या' राशींना मिळणार छप्परफाड पैसा, नोकरीची संधी

Navpancham Rajyog 2025: या राजयोगांचा प्रभाव सर्व राशींच्या व्यक्तींवर होताना दिसतो. नवग्रहांमध्ये बुद्धिमत्ता, व्यवसाय आणि तर्क देणारा बुध महिन्यातून दोनदा आपली राशी बदलतो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. या ग्रहांच्या गोचरमुळे अनेकदा विविध राजयोगाची निर्मिती होते. याशिवाय या राजयोगांचा प्रभाव सर्व राशींच्या व्यक्तींवर होताना दिसतो. नवग्रहांमध्ये बुद्धिमत्ता, व्यवसाय आणि तर्क देणारा बुध महिन्यातून दोनदा आपली राशी बदलतो.

आजच्या दिवशी बुध ग्रह युरेनससोबत नवपंचम राजयोग तयार केला आहे. पंचांगानुसार 24 जानेवारीला पहाटे 3:35 वाजता बुध आणि युरेनस एकमेकांपासून 120 अंशांवर असणार आहे. त्यामुळे नवपंचम राजयोग तयार झाला आहे. ज्यावेळी दोन ग्रह एकाच अंशात 120 अंशावर किंवा पाचव्या आणि नवव्या स्थानावर असतात त्यावेळी हा नवपंचम योग तयार होतो.

नवपंचम राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या आयुष्यात नव्याने आनंद येणार आहे. त्याचप्रमाणे काही राशींच्या व्यक्तींना करियरमध्ये चांगली संधी मिळणार आहे. यामध्ये कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

वृषभ रास

या राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांची प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकणार आहेत. नशीब पूर्णपणे तुमच्या पाठीशी असणार आहे. तुम्हाला वडील, आई, शिक्षक आणि मार्गदर्शक यांचे पूर्ण सहकार्य मिळणार आहे. या काळात अध्यात्माकडे तुमचा कल असणार आहे.

कर्क रास

या राशीच्या लोकांसाठी बुध-अरुण यांनी तयार केलेला नवपंचम राजयोग खूप खास असणार आहे. भागीदारीत केलेल्या व्यवसायात भरपूर फायदा होईल. तुम्हाला परदेशी कंपनीकडून चांगला नफा मिळू शकणार आहे. तुम्हाला कोर्ट - कचेरीच्या कामात यश मिळण्याची संधी आहे. कामाच्या ठिकाणी लाभ मिळणार आहे.

कन्या रास

या राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग खूप चांगला असणार आहे. तुम्ही तुमच्या करिअरशी संबंधित उद्दिष्टे साध्य करण्यात यशस्वी होऊ शकणार आहात. तुम्ही खूप दिवसांपासून करत असलेली मेहनत आता यशस्वी होऊ शकणार आहे. करिअर सुरू करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking! धक्कादायक! मुंबईतील के.व्ही.के शाळेत पुन्हा विषबाधेचा प्रकार; कापूर पडलेल्या तेलात तळले वडे?

Aadhar card : आधार कार्डावरील नाव किती वेळा बदलू शकतो? ९० टक्के लोकांना उत्तर माहीत नाही

Chinese Chutney: मंच्युरियनची तिखट लाल चटणी कशी बनवायची?

Maharashtra Live News Update: पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरातील एका इमारतीजवळ खून

Leopard Safety: बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये वाढ; बचावासाठी 'या' टिप्स लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT