Budh Vakri 2023 Saam Tv
राशिभविष्य

Budh Gochar: उद्या बुध ग्रह करणार राशीत बदल; दिवाळीमध्ये 'या' 3 राशींची होणार चांदीच चांदी

Mercury Transit 2025 Diwali: बुध ग्रह सध्या तूळ राशीत आहे, पण शुक्रवार, २४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजून ३९ मिनिटांनी तो मंगळाची रास असलेल्या वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. पाहूया कोणत्या आहेत त्या राशी ज्यांच्यावर बुध ग्रहाची विशेष कृपा बरसणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रात नवग्रहांपैकी प्रत्येक ग्रहाचं वेगळं महत्त्व आणि प्रभाव मानलं जातं. त्यात बुध ग्रहाला सर्वात बुद्धिमान आणि प्रभावशाली ग्रह मानण्यात येतं. बुधला ग्रहांचा राजकुमार म्हणतात कारण तो बुद्धी, वाणी, व्यापार आणि संवाद यांचा कारक आहे.

आता बुध पुन्हा एकदा आपली चाल बदलणार आहे. यावेळी उद्या बुध ग्रह तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. या गोचरामुळे काही राशींना विशेष लाभ मिळणार आहे. चला पाहूया कोणत्या राशींचे नशीब या बदलामुळे उजळणार आहे.

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचा गोचर फायदेशीर ठरणार आहे. नवीन प्रोजेक्ट किंवा डीलमधून नफा मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ अनुकूल आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना चांगली बातमी मिळू शकणार आहे. विदेशात शिक्षण किंवा नोकरी करण्याचे स्वप्न असलेल्यांसाठीही ही वेळ अनुकूल ठरू शकते.

कन्या राशी

कन्या राशीच्या व्यक्तींना बुध ग्रहाचा गोचर अत्यंत सकारात्मक परिणाम देईल. नवीन लोकांशी संपर्क होईल, जे पुढे जाऊन व्यवसायात मदत करतील. बुधचा प्रभाव तुमच्या बोलण्यात गोडवा आणेल आणि नातेसंबंध सुधारणार आहेत. जे लोक प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत होते, त्यांच्यासाठी ही वेळ योग्य आहे.

धनू राशी

धनू राशीच्या लोकांसाठी हा काळ नवीन सुरुवातीचा असणार आहे. नोकरी बदलण्याचे किंवा नवीन संधी मिळण्याचे योग आहेत. व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो आणि नवीन करार किंवा डील मिळू शकते. कला, मीडिया आणि संचार क्षेत्रातील लोक आपली ओळख अधिक मजबूत करतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ayushman Bharat: ५ लाख नाही तर १० लाखांपर्यंत मोफत उपचार; कोणत्या कुटुंबांना होणार फायदा? वाचा सविस्तर माहिती

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मेट्रोचं जाळं विस्तारणार; 31 किमी लांबीच्या २ मार्गिका अन् २८ स्थानके

SCROLL FOR NEXT