Mangal Vakri 2024 saam tv
राशिभविष्य

Mangal Vakri : 80 दिवस वक्री राहणार मंगळ; 'या' राशींच्या समस्या संपणार, होणार केवळ पैशांचा वर्षाव

Mangal Vakri 2024: मंगळ मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी असून त्याचा करिअर, संपत्ती आणि आर्थिक स्थितीवर चांगला प्रभाव पडतो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये मंगळ ग्रहाला पराक्रम, साहस यांचा कारक मानलं जातं. त्यामुळे मंगळाच्या स्थिती बदलाचा प्रत्येक राशींच्या व्यक्तींवर परिणाम होतो. मंगळ मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी असून त्याचा करिअर, संपत्ती आणि आर्थिक स्थितीवर चांगला प्रभाव पडतो. सध्या मंगळ कर्क राशीच्या सर्वात खालच्या राशीत असून नवीन वर्ष 2025 पर्यंत मंगळ याच राशीत राहणार आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार डिसेंबर महिन्यात मंगळ ग्रह वक्री चाल चालणार आहे. मंगळ 7 डिसेंबर रोजी सकाळी 5.01 वाजता कर्क राशीत उल्टा फिरणार असून 24 फेब्रुवारी 2025 पर्यंत याच स्थितीत असणार आहे. मंगळ या राशीत सुमारे 80 दिवस वक्री राहणार आहे. मंगळाच्या वक्री स्थितीचा कोणत्या राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळणार आहे याची माहिती घेऊया.

कर्क रास

या राशीमध्ये मंगळ ग्रहाच्या चढत्या घरात वक्री होणार आहे. तुमच्या कामाशी संबंधित समस्या संपुष्टात येऊ शकतात. अभ्यासात मुलांना भेडसावणाऱ्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. तुम्हाला बरेच फायदे मिळू शकणार आहे. व्यवसायामध्ये क्षेत्रातही भरपूर फायदा होणार आहे. गुंतवणूकीत तुम्हाला भरपूर नफा मिळू शकणार आहे.

कन्या रास

या राशीत मंगळ अकराव्या घरात वक्री होणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. तुमच्या मेहनतीमुळे आणि सततच्या प्रयत्नांमुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगली संधी मिळू शकते. व्यवसायाच्या क्षेत्रात भरपूर नफा कमवू शकता. आर्थिक लाभाच्या अनेक शक्यता आहेत.

वृश्चिक रास

या राशीत मंगळ नवव्या भावात वक्री होणार आहे. तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक स्त्रोत उघडू शकणार आहेत. तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमचे काम उत्तम चालणार आहे. नवीन व्यवसायातून भरपूर नफा कमावता येणार आहे. कुटुंबातून तुमच्यासाठी चांगली बातमी समोर येणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : केबिनचा दरवाजा लावला,कपडे काढायला सांगितले अन्... उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत डॉक्टरचे अश्लील कृत्य

Maharashtra Live News Update : वाशिममध्ये शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला

Dahi Puri Recipe: मुंबईची स्पेशल चटपटीत दही पुरी कशी बनवायची? सोपी रेसिपी वाचा

Summer Hairstyles: उन्हाळ्यात घामामुळे केस खराब होतात? या 5 ट्रेंडी हेअरस्टाईल्स करा

Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीसाठी मोठ्या हालचाली; शरद पवार मैदानात?, VIDEO

SCROLL FOR NEXT