Mangal Gochar  saam tv
राशिभविष्य

Mangal Margi: 24 फेब्रुवारी रोजी मंगळ चालणार सरळ चाल; 'या' राशींवर होणार वाईट परिणाम, मोठ्या नुकसानीची शक्यता

Mangal Margi 2025: मंगळ ग्रह मार्गी दिशेने जात असल्याने काही राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. या वेळी काही राशींना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात येतोय.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल होतात. यामध्ये काही ग्रह वेळोवेळी ग्रह वक्री आणि मार्गी देखील होतात. मंगळाला ग्रहांचा सेनापती मानले जाते. तो धैर्य, ऊर्जा, शौर्य याचा कारक आहे. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी मंगळ ग्रह मार्गी होणार आहे. मंगळाच्या या चालीचा प्रत्येक राशीवर परिणाम होणार आहे.

सध्या, मंगळ मिथुन राशीत आहे आणि तो वक्री दिशेने जातोय. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ५:१७ वाजता मंगळ या राशीत मार्गी होणार आहे असेल. मंगळ ग्रह मार्गी दिशेने जात असल्याने काही राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. या वेळी काही राशींना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात येतोय. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

कर्क रास

कन्या लग्नाच्या लोकांच्या दहाव्या घरात मंगळ मार्गी होणार आहे. यामुळे तुमची आक्रमकता वाढणार आहे. तुमच्या व्यावसायिक जीवनातही तुम्हाला समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. बॉस आणि सहकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता देखील असू शकणार आहे. कोर्टाच्या केसेसमध्ये तुम्ही अडकण्याची शक्यता आहे.

वृश्चिक रास

या राशीच्या लोकांच्या आठव्या घरात मंगळाचं हे परिवर्तन होणार आहे. या काळात तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. काही दुखापत किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता देखील आहे. या काळात तुम्ही कर्ज घेणं किंवा देणं टाळलं पाहिजे. मोठं नुकसान किंवा अपघात होऊ शकतो.

धनु रास

धनु राशीच्या लोकांच्या ७ व्या घरात मंगळ मार्गी होणार आहे. विवाहित जोडप्यांसाठी हा काळ वाईट असू शकतो. व्यवसायातही तुम्हाला अडचणी येऊ शकतात. कोर्टकचेरीच्या बाबतीत निर्णय काळजीपूर्वक घ्या. कामाच्या ठिकाणी तुम्हाला खूप त्रास होण्याची शक्यता आहे. नात्यांमध्ये भांडणे इत्यादी होऊ शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डीएची घोषणा झाल्यावर ४ महिन्याचा एरियर मिळणार? केंदीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणार परिणाम

8th Pay commission मुळे बेसिक पेमेंट किती वाढणार? समजू घ्या फिटमेंट फॅक्टरचे गणित

April Bank Holiday: पुढच्या आठवड्यात बॅंकांना किती सुट्ट्या असणार? RBI ने दिली यादी; वाचा

How To Make Gel Shampoo: या 3 गोष्टींनी घरीच बनवा जेल शॅम्पू, केसांची होईल मुळापासून वाढ

Bihar Politics: मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? बिहारमध्ये भाजपने खेळला मोठा डाव

SCROLL FOR NEXT