Zodiac Signs saam tv
राशिभविष्य

Mangal Gochar: 18 महिन्यांनी मंगळ ग्रह करणार शुक्राच्या राशीत प्रवेश; 'या' राशींचं नशीब फळफळणार, नवी नोकरीही हाती येणार

Mars in Venus sign: ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ आणि शुक्र हे दोन ग्रह वेगवेगळ्या राशींमध्ये ठराविक कालावधीसाठी भ्रमण करतात आणि त्यांच्या युतीचा प्रत्येक राशीवर वेगळा प्रभाव पडतो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक पंचांगानुसार, ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत एका निश्चित कालावधीत गोचर करतात. ज्याचा थेट परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होतो. सप्टेंबरमध्ये पृथ्वीचा पुत्र मंगळ तूळ राशीत गोचर करणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे.

मात्र यावेळी काही राशी अशा आहे ज्यांना मंगळाच्या गोचरचा फायदा होणार आहे. यामध्ये 3 राशी आहेत, ज्यांना यावेळी मंगळाचा आशीर्वाद मिळू शकतो. यावेळी काही राशींच्या जीवनात सुखाचे दिवस येणार आहेत. तर काहींची करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी मंगळाचं भ्रमण सकारात्मक ठरू शकणार आहे. मंगळ तुमच्या राशीपासून सातव्या घरात भ्रमण करणार आहे. विवाहित लोकांच्या जीवनात गोडवा वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराचं पूर्ण सहकार्य मिळू शकणार आहे. तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी मंगळाच्या राशीतील बदल अनुकूल ठरू शकणार आहे. मंगळ तुमच्या राशीच्या धन आणि वाणी स्थानात भ्रमण करणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यत आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामं आता अखेर मार्गी लागणार आहेत. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे.

तूळ रास

मंगळाच्या राशीतील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. तुमचं धैर्य आणि शौर्य वाढणार आहे. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर नवीन करार आणि नफ्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहणार आहे. तुमच्या जोडीदाराची प्रगती होऊ शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Airport: नवी मुंबई एअरपोर्ट प्रवाशांसाठी सुरु! पहिलं विमान दाखल | VIDEO

Maharashtra Live News Update : पुण्याच्या भाजप प्रवेशाचा तिसरा अंक आज मुंबईत

Shocking : वंशाला दिवाच हवा म्हणून गर्भपात केला, पण महिलेचा जीव गेला, सोलापूरमधील धक्कादायक घटना

Gold Price Today : आजपण सोनं महागलं, ख्रिसमसला प्रति तोळा इतका दर वाढला, पाहा ताजे रेट्स

BOI Recruitment: खुशखबर! फ्रेशर्ससाठी बँकेत नोकरी; ४०० पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

SCROLL FOR NEXT