Mangal Gochar saam tv
राशिभविष्य

Mangal Gochar: काही तासांनंतर मंगळ करणार बुधाच्या घरात प्रवेश; 'या' 3 राशींवर होणार सकारात्मक प्रभाव

Mangal Gochar In Kanya 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे गोचर मानवी जीवनावर मोठा प्रभाव पाडतात. लवकरच, ग्रहांचा सेनापती मानला जाणारा मंगळ ग्रह बुध ग्रहाच्या मिथुन राशीत प्रवेश करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ ग्रह इतर ग्रहांप्रमाणे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. हे गोचर केवळ खगोलशास्त्रीय घटना नसून, त्याचा थेट परिणाम आपल्या जीवनातील विविध क्षेत्रांवर होतो विशेषतः करिअर, संपत्ती,आणि नातेसंबंध यावर. मंगळ ग्रह बुधाच्या कन्या राशीत प्रवेश करणार आहे.

बुध आणि मंगळ हे दोघेही तेजस्वी ग्रह असून त्यांच्या युतीचा प्रभाव काही राशींना प्रचंड लाभदायक ठरू शकतो. दरम्यान मंगळाच्या गोचरचा कोणत्या राशींवर अधिक परिणाम होणार आहे ते पाहूयात.

मिथुन रास

मिथुन राशीसाठी मंगळ ग्रहाचं कन्या राशीत आगमन अत्यंत सकारात्मक ठरू शकणार आहे. कारण मंगळ या काळात त्यांच्या कुंडलीच्या चतुर्थ भावात गोचर करणार आहे. जो भाव ‘सुख’ आणि स्थावर मालमत्ता याचं प्रतिनिधित्व करणार आहे. या काळात तुम्हाला घरगुती सुखसुविधा, वाहन, नवीन घर किंवा प्रॉपर्टी खरेदीची संधी मिळू शकते. करिअरमध्येही यशाच्या नव्या संधी मिळू शकतात.

सिंह रास

सिंह राशीसाठी हे राशी परिवर्तन अत्यंत लाभदायक ठरणार आहे. मंगळ या काळात त्यांच्या कुंडलीच्या द्वितीय भावात प्रवेश करणार आहे. मंगळ रास जो ‘धन’, ‘वाणी’ आणि ‘कुटुंब’ या गोष्टींशी संबंधित असतो. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. यावेळी महत्त्वाच्या व्यक्तींशी व्यावसायिक संबंध जोडले जातील. ज्यामुळे भविष्यात नवीन संधी मिळू शकतात.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे राशी परिवर्तन म्हणजे संधींचा महासागर असणार आहे. मंगळ ग्रह या काळात त्यांच्या कुंडलीच्या अकराव्या भावात म्हणजेच 'लाभ स्थानात' प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे मंगळ हेच वृश्चिक राशीचे स्वामी ग्रह आहेत. या काळात तुमच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : खुशखबर! सोनं ₹१०००० ने झालं स्वस्त, प्रति तोळा किंमत किती? वाचा १८,२२ अन् २४ कॅरेटचे ताजे दर

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये रिंगरोड बाधित शेतकऱ्यांचे भाजप कार्यालयावर आंदोलन

Vande Bharat Sleeper Train: १२० वंदे भारत स्लिपर येणार; पहिलं प्रोटोटाइप या महिन्यात येणार, वाचा लेटेस्ट अपडेट

Atal Setu : अटल सेतूवर कार थांबवली अन् थेट समुद्रात उडी मारली; पुण्यातील २८ वर्षीय तरुणाच्या पाऊलाने खळबळ

जिम-डाएटिंगचा खर्च वाचेल! दररोज ३० मिनिटे सायकल चालवल्याने पोटाची चरबी मेणासारखी वितळेल

SCROLL FOR NEXT