Mangal Gochar saam tv
राशिभविष्य

Mangal Gochar: चैत्र नवरात्रात मंगळाचं होणार 'महागोचर'; 'या' ३ राशींना मिळणार अपाम पैसा आणि संपत्ती

Mangal Gochar 2025 Chaitra Navratri: पुढच्या महिन्याच्या सुरुवातीलाच मंगळ ग्रह गोचर करणार आहे. चैत्र नवरात्रातील हे मंगळाचं गोचर काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

हिंदू पंचागानुसार, ३० मार्चपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होतेय. ज्योतिष्य शास्त्रामध्ये हिंदू धर्मातील सणांना विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे. दरम्यान या नवरात्रीमध्ये काही ग्रहांचं गोचर होणार असून त्याचा विशेष परिणाम होण्याची शक्यता आहे. या काळात मंगळ ग्रह गोचर करणार असून तो ३ एप्रिल रोजी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे.

वैदिक ज्योतिष्य शास्तानुसार, कोणत्याही ग्रहाने त्याच्या राशीमध्ये बदल केला की त्याचा परिणाम सर्व राशींवर होतो. २ एप्रिलपर्यंत मंगळ मिथुन राशीत विराजमान राहणार असून तो ३ एप्रिल रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. चैत्र नवरात्रीतील मंगळाच्या या गोचरचा फायदा कोणत्या राशींना कशा प्रकारे होणार आहे ते पाहूयात.

कन्या रास

मंगळाच्या बदलेली चाल या राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. तुमच्या जीवनात अनेक चांगल्या गोष्टी घडण्याची शक्यता आहे. जीवनात आनंद येणार असून व्यापारात तुमचाल फायदा होणार आहे. आर्थिक सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. तुम्हाला चांगली आणि नवी नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

तूळ रास

मंगळाच्या बदलेल्या चालीचा या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे. या काळात तुमच्याकडे पैशांची कमतरता नसणार आहे. प्रत्येक कामात तुमची प्रशंसा होण्याची शक्यता आहे. व्यापारात तुम्हाला खूप पैसा मिळणार आहे. दुर्गा मातेचा आशीर्वाद तुमच्यासोबत राहणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींसाठी आनंदाची बातमी असणार आहे.

मकर रास

मंगळाची बदललेली चाल तुमची आर्थिक स्थिती मजबूत करणार आहे. छोटे प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत. नवी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. या चैत्र नवरात्रात तुम्ही जी काही कामं कराल त्यामध्ये तुम्हाला लाभ होणार आहे. जमीनीशी काही व्यवहार केला असेल तर त्यामधून तुम्हाला चांगले पैसे मिळणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tea : नेहमीचा चहा करताना घाला या ३ गोष्टी फक्कड होईल चहा पोटही होईल कमी

रील्ससाठी छतावर चढली महिला अन् पाय घसरून पडली; धक्कादायक घटना मोबाईलमध्ये कैद

Karjat Station Accident : पती दिसला नाही म्हणून महिलेने धावत्या ट्रेनमधून मारली उडी; रेल्वे पोलिसांनी वाचवले प्राण

Rautwadi Waterfall : पावसाळ्यात पर्यटकांना खुणावतोय 'राऊतवाडी धबधबा', निसर्ग सौंदर्यात हरवून जाल

Shocking: संभाजीनगरच्या बालगृहातून ९ मुली का पळाल्या? धक्कादायक कारण आलं समोर; केंद्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल

SCROLL FOR NEXT