Mangal Gochar saam tv
राशिभविष्य

Mangal Ast: 139 दिवस ग्रहांचा सेनापती मंगळ राहणार अस्त; 'या' राशींवर कोसळणार दुःखाचा डोंगर, अडचणीही वाढणार

Mangal Ast in Vrischik Rashi: ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा सेनापती म्हणून ओळखला जाणारा मंगळ ग्रह नुकताच वृश्चिक राशीत अस्त झाला आहे. मंगळाचा हा अस्त काळ सुमारे १३९ ते १८२ दिवसांपर्यंत लांबणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक पंचांगानुसार, प्रत्येक ग्रह त्याची एक ठराविक वेळ आली की त्यांच्या राशीत बदल करतो. यामध्ये काही ग्रह अस्त आणि उदय देखील होतात. ग्रहांची ही स्थितीत काळानुसार घडत असते. ज्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येतो.

नुकतंच मंगळ ग्रह अस्त झाला आहे. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी गुरुवारी मंगळ ग्रह स्वतःच्या वृश्चिक राशीत पहाटे ३ वाजून १० मिनिटांनी अस्त झाला आहे. मंगळ ग्रहाच्या अस्तामुळे काही राशींना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तर काहींना मानसिक ताणाचा सामना करावा लागू शकते. यावेळी कोणत्या राशींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो ते पाहूया

मेष राशी (Aries)

मेष राशीच्या व्यक्तींना मंगळ ग्रहाचा अस्त होणं हानिकारक ठरू शकणार आहे. मंगळ ग्रह तुमच्या राशीपासून अष्टम भावात अस्त झाला आहे. या काळात तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकणार आहे. वैयक्तिक नातेसंबंधात अडचणी निर्माण होऊ शकतात. पाठीच्या दुखण्याचा त्रास होऊ शकतो.

मिथुन राशी (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी मंगळ ग्रहाचा अस्त होणे नुकसानदायक ठरू शकते. मंगळ ग्रह तुमच्या राशीपासून सहाव्या भावात अस्त झाला आहे. त्यामुळे कोर्ट-कचेरीसंबंधी कामांमध्ये अपयश मिळण्याची शक्यता आहे. करिअरच्या क्षेत्रात अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. व्यवसायातही काही प्रमाणात नुकसान संभवते.

मीन राशी (Pisces)

मीन राशीच्या व्यक्तींना मंगळ ग्रहाचा अस्त होणं त्रासदायक ठरू शकणार आहे. कारण मंगळ ग्रह तुमच्या राशीपासून नवव्या भावात अस्त झाला आहे. त्यामुळे या काळात तुमच्या कामांमध्ये यश मिळवण्यासाठी भाग्याचा साथ मिळणार नाही. कुटुंबात काही समस्या उद्भवू शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Taj Mahal: कोणाच्या जमिनीवर बांधला गेल्या ताजमहाल? पाहा कोण होचं जमिनीचा मालक?

Pune Police : वाहतूक कोंडीची कटकट मिटवण्यासाठी थेट आयुक्त रस्त्यावर उतरले, भल्यापहाटे घेतला आढावा

Maharashtra Nagar Parishad Live : भाजपवर आरोप करणाऱ्या निलेश राणेंकडूनही पैशांचे वाटप, वैभव नाईक यांचा आरोप

Office Snacks: ऑफिसमध्ये काम करताना भूक लागते? जंक फूड खाण्याऐवजी 'हा' पदार्थ कायम बॅगमध्ये ठेवा

मोठी बातमी! ३ की २१ डिसेंबर, राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी कधी ? कोर्टात आज होणार फैसला

SCROLL FOR NEXT