Navpancham Rajyog saam tv
राशिभविष्य

Navpancham Rajyog: उद्या मंगळ-शनी बनवणार नवपंचम राजयोग; 'या' राशींच्या तिजोरीत येणार भरपूर पैसा, प्रेमसंबंध सुधारणार

Navpancham Rajyog 2025: उद्या सायंकाळी 6 वाजून 37 मिनिटांनी मंगळ आणि शनी नवव्या आणि पाचव्या भावात म्हणजेच एकमेकांपासून सुमारे 120 अंश अंतरावर असणार आहेत. ज्यामुळे नवपंचम राजयोग तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रहांच्या गोचरमुळे राजयोग तयार होतात. या राजयोगांच्या निर्मितीने प्रत्येक राशीवर काही ना काही परिणाम होत असतो. यामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक परिणामांचा समावेश आहे. ज्योतिषशास्त्रात शनी आणि मंगळ हे अत्यंत महत्त्वाचे ग्रह मानले जातात.

9 फेब्रुवारी म्हणजेच उद्या सायंकाळी 6 वाजून 37 मिनिटांनी मंगळ आणि शनी नवव्या आणि पाचव्या भावात म्हणजेच एकमेकांपासून सुमारे 120 अंश अंतरावर असणार आहेत. ज्यामुळे नवपंचम राजयोग तयार होणार आहे. अशावेळी काही राशींना बंपर लाभ मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग अत्यंत लाभदायक ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. ज्यामुळे आपण प्रत्येक क्षेत्रात अपार यशासह धन मिळवू शकता. या काळात तुम्ही भरपूर नफाही कमावू शकता. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे.

मीन रास

मीन राशीच्या व्यक्तींसाठी नवपंचम योग खूप खास ठरण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांच्या सुखसोयी झपाट्याने वाढू शकतात. त्यातील केवळ सात कुटुंबांना पूर्ण पाठिंबा मिळू शकतो. व्यवसायात तुम्हाला विरोधक कडवी स्पर्धा देताना दिसू शकता. जीवनात शांतता राहणार आहे.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग अत्यंत लाभदायक ठरू शकतो. व्यापाराशी संबंधित व्यवसायात भरपूर नफा होऊ शकतो. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. जीवनात सुखाचे क्षण येणार आहे. उत्पन्नाचे अनेक स्त्रोत उघडू शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election: आधी स्वबळाची घोषणा, ऐनवेळी वंचितशी युती; BMCसाठी काँग्रेसला का हवी आंबेडकरांची साथ,नवी आघाडीची रणनीती काय?

Maharashtra Live News Update: मनसेच्या उमेदवारांची यादी आजही जाहीर होणार नाही?

Ajit Pawar : पाप कुठे फेडणार..., अजित पवारांचा रोख नेमका कुणाकडे?

BMC Election: मोठी बातमी! ठाकरेसेनेकडून ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कुणाली दिली संधी?

Rupali Bhosle Mangalsutra Designs: अभिनेत्री रूपाली भोसलेच्या मंगळसूत्राची महिलांमध्ये क्रेझ, या 5 डिझाईन्स तुम्हीही नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT