Mars Transit Saam Tv
राशिभविष्य

Mangal Gochar: बुधाच्या राशीत वक्री अवस्थेत मंगळ करणार गोचर; 'या' राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस

Mangal Gochar 2025: ग्रहांच्या उलट हालचालीचे नकारात्मक परिणाम दिसून येतात, परंतु 21 जानेवारीला मंगळाचा हा राशी परिवर्तन काही राशीच्या लोकांसाठी खूप खास मानला जातो.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार, ठराविक ग्रह गोचरप्रमाणे वक्री आणि मार्गी देखील होतात. असंच मंगळ सध्या वक्री अवस्थेत असून लवकरच तो मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. या वर्षातील मंगळाचे हे पहिलं मोठं गोचर असल्याचं म्हटलं जातंय. वक्री अवस्थेत मंगळाचा प्रभाव वेगळा असतो.

ग्रहांच्या वक्री हालचालीचे नकारात्मक परिणाम दिसून येतात, परंतु 21 जानेवारीला मंगळाचा हा राशी परिवर्तन काही राशीच्या लोकांसाठी खूप खास मानला जातो. मंगळाच्या या गोचरने या राशीच्या लोकांच्या भाग्याची सुरुवात होणार आहे असं ज्योतिष्य तज्ज्ञांचं मत आहे.

कधी होणार मंगळाचं गोचर?

ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ 7 डिसेंबर 2024 रोजी वक्री झाला आणि 24 फेब्रुवारी 2025 रोजी मार्गी होणार आहे. यापूर्वी 21 जानेवारी 2025 रोजी मंगळ मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान मंगळाचं गोचर कोणत्या राशीसाठी उपयुक्त ठरणार आहे त जाणून घेऊया.

वृषभ रास

मिथुन राशीत मंगळाचं गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांसाठी धनाच्या घरात मंगळाचं भ्रमण होणार आहे. ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायात प्रगतीची संधी मिळू शकणार आहे.

तूळ रास

तूळ राशीसाठी मंगळ नवव्या भावात प्रवेश करणार आहे. या काळात नशीब तुमच्या सोबत असणार आहे. तुमची प्रलंबित कामंही पूर्ण होऊ शकतात. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. कठीण प्रसंगांना तोंड देण्यासाठी तुम्हाला शक्ती आणि धैर्य मिळणार आहे.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी मंगळाचं गोचर हे संक्रमण खूप शुभ राहणार आहे. प्रेम जीवनातील सर्व समस्या समाप्त होणार आहेत. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहू शकतात. आरोग्य चांगलं राहणार आहे. या काळात नशीब तुमच्या बाजूने राहिल्याने जीवनाच्या इतर क्षेत्रातही सकारात्मक बदल दिसून येणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात कोणती सनस्क्रीन वापरायची?

Maharashtra News Live Update: जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार

Bone cancer symptoms: हाडं सतत दुखतायत म्हणून दुर्लक्ष करताय? डॉक्टरांनी सांगितली बोन कॅन्सरची सुरुवातीची चार महत्त्वाची लक्षणं

Ahilyanagar Crime: मंदिरातील बाथरूममध्ये साधूचं नको ते कृत्य, नग्न अवस्थेत महिलेसोबत आढळला; अहिल्यानगरमध्ये खळबळ

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! तुमचाही पगार दुप्पट होणार? लाभार्थ्यांची संपूर्ण यादी आली समोर

SCROLL FOR NEXT