Mangal Nakshatra Gochar saam tv
राशिभविष्य

Mangal Nakshatra Gochar: मंगळाच्या नक्षत्र गोचरमुळे 'या' राशींना लागणार लॉटरी; बँक बॅलन्स वाढणार, धनलाभही होणार

Mangal Nakshatra Parivartan 2025: मंगळाच्या राशीत बदल होणार आहे. मंगळ गुरू ग्रहाच्या नक्षत्रात प्रवेश करणार असून 12 जानेवारीला मंगळ पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश गोचर करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह त्यांच्या ठरलेल्या वेळी राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रह राशी बदलाप्रमाणे नक्षत्र देखील बदलतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ नक्षत्रात सुमारे 45 दिवस राहतो. अशा स्थितीत 12 राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडण्याची शक्यता असते. लवकरच मंगळाच्या राशीत बदल होणार आहे. मंगळ गुरू ग्रहाच्या नक्षत्रात प्रवेश करणार असून 12 जानेवारीला मंगळ पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश गोचर करणार आहे.

पंचांग नुसार, मंगळ रविवार, 12 जानेवारी 2025 रोजी रात्री 11:52 वाजता गुरु ग्रहाच्या नक्षत्रात प्रवेश करणार आहे. पुनर्वसु नक्षत्रात मंगळाचा प्रवेश 3 राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. मंगळाच्या नक्षत्र गोचरचा कोणत्या राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे ते पाहूयात.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी काळ चांगला राहणार आहे. तुम्ही काम करत असाल तर तुमच्या कामाची स्तुती ऐकायला मिळू शकते. तुमचे सहकारी तुमच्या कामाचं कौतुक करणार आहेत. आर्थिक स्थिती मजबूत होणार असून तुमची प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. या काळात नवीन जबाबदाऱ्याही तुमच्या प्रतिक्षेत असणार आहेत. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे.

धनु रास

12 जानेवारीपासून धनु राशीच्या लोकांच्या आयुष्यात नवीन बदल घडणार आहेत. तुम्ही वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता. नवीन मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. या काळात जोडीदाराशी नातं घट्ट होणार आहे. तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळू शकतं.

सिंह रास

मंगळाचा रास बदल सिंह राशीसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. गुंतवणुकीचा विचार करू शकता ज्यामुळे नफा मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात तुमची रुची वाढणार आहे. अनावश्यक तणावापासून दूर राहणार आहे. या काळात तुमच्या घरी आनंदाची बातमी येणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT