Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Rajyog 2025: 14 मार्चपासून 'या' 3 राशी होणार गडगंज श्रीमंत; 2 राजयोगांच्या निर्मितीसह शनीदेवाची राहणार कृपा

Shash And Malavya Rajyog: १४ मार्च रोजी होळीचा सण साजरा होणार असून या दिवशी अनेक दुर्मिळ योगायोग घडतोय. या दिवशी शुक्र त्याच्या उच्च राशी मीन राशीत असल्याने मालव्य राजयोग तयार होणार आहे. याशिवाय शनी मूळ त्रिकोण राशी कुंभात असल्याने शश राजयोग तयार होतोय.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीत बदल करतो. यावेळी काही ग्रह नक्षत्रामध्ये देखील बदल करतात. नवीन मार्च महिना सुरु झाला असून या महिन्यात अनेक मोठे ग्रह त्यांच्या राशीत बदल करणार असून त्यामुळे राजयोगांची निर्मिती होणार आहे.

१४ मार्च रोजी होळीचा सण साजरा होणार असून या दिवशी अनेक दुर्मिळ योगायोग घडतायत. या दिवशी शुक्र त्याच्या उच्च राशी मीन राशीत असल्याने मालव्य राजयोग तयार होणार आहे. याशिवाय शनी मूळ त्रिकोण राशी कुंभात असल्याने शश राजयोग तयार होतोय. त्याचप्रमाणे सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुधादित्य योग निर्माण होतोय. शुक्र आणि बुध यांच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण योग निर्माण होणार असून या राजयोगांच्या निर्मितीमुळे काही राशींना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

कुंभ रास

या राशीच्या लग्नाच्या घरात शश राजयोग तयार होणार असून दुसऱ्या घरात मालव्य राजयोग तयार होणार आहे. अशा परिस्थितीत, या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळवू शकतात. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामं पुन्हा एकदा सुरू होऊ शकणार आहे. तुम्ही स्वतःमध्ये बरेच बदल घडवून आणाल.

मकर रास

या राशीच्या लोकांसाठी शश आणि मालव्य राजयोग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाणार आहे. तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात ते करणे फायदेशीर ठरू शकतं. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळू शकते. तुम्हाला कर्जातून मुक्तता मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे.

मिथुन रास

या राशीच्या लोकांसाठी शश आणि मालव्य राजयोग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळू शकतं. कुटुंब किंवा मित्रांसोबत अनेक धार्मिक सहलींना जाऊ शकता. मुलांकडून येणाऱ्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. तुमच्या कारकिर्दीत ज्या समस्या येत आहेत त्या आता संपुष्टात येणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

निवडणूक आयोगाला 2 लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा जोरदार दणका, काय आहे प्रकरण? VIDEO

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना फटका

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

SCROLL FOR NEXT