Malavya Rajyog saam tv
राशिभविष्य

Malavya Rajyog: शुक्राच्या स्थिती बदलाने तयार होणार मालव्य राजयोग; 'या' राशींना मिळणार बंपर फायदा

Malavya Rajyog: २९ जून रोजी महिन्याच्या अखेरीस शुक्र ग्रहाचा मोठा बदल होणार आहे. सुख-संपत्ती आणि ऐश्वर्याचे प्रतिक असलेला शुक्र, या दिवशी स्वतःच्या राशीत प्रवेश करणार आहे. या ग्रहस्थितीमुळे 'मालव्य राजयोग' तयार होईल

Surabhi Jayashree Jagdish

जून महिना हा ग्रहांच्या गोचरच्या हिशोबाने फार महत्त्वाचा मानला जातो. यावेळी अनेक ग्रहांची राशी बदलण्याबरोबरच इतर ग्रहांशीही युती होणार आहे. वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह ठराविक अंतराने भ्रमण करतात. यामुळे विविध शुभ राजयोग तयार करतात. ज्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर दिसणार आहे.

जून महिन्यात असाच एक राजयोग तयार होणार आहे. या महिन्याच्या अखेरी म्हणजेच २९ जून रोजी भौतिक सुख-सुविधा आणि समृद्धीचा ग्रह मानला जाणारा शुक्र ग्रह स्वतःच्या राशीत भ्रमण करणार आहे. शुक्राच्या या स्थिती बदलामुळे मालव्य राजयोगाची निर्मिती होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींचे लाभाचे दिवस येणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी जून महिन्यात केलेला मालव्य राजयोग अत्यंत शुभ आणि अनुकूल सिद्ध होणार आहे. यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. तसंच व्यक्तिमत्त्वात सुधारणा होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला कामांमध्ये यश मिळण्याचा दिवस आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ व्यतीत होणार आहे.

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी मालव्य राजयोगाची निर्मिती अत्यंत शुभ असणार आहे. यावेळी तुम्हाला नव्या घराचा आनंद मिळू शकतो. मुलांकडून काही चांगली बातमी ऐकू येणार आहे. ज्याचं प्रेम आहे त्यांना यात यश मिळू शकणार आहे.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी मालव्य राजयोग अत्यंत शुभ सिद्ध होणार आहे. नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी हा राजयोग तयार होणार आहे. या काळात तुम्हाला चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना नोकरीच्या नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway : रेल्वे प्रवासातील गर्दीचा ताण कमी होणार, २०३० पर्यंत ४८ प्रमुख शहरांमध्ये क्षमता दुप्पट करणार; काय म्हणाले रेल्वे मंत्री? वाचा

BJP-Shivsena Crisis: गल्लीत नुसता गोंधळ! भाजप-शिवसेनेत जमेना, कुठे कडाडून विरोध तर, कुठे नाराजीनामे

शरद पवारांना मोठा धक्का! निष्ठावंत नेत्याने २६ वर्षांची साथ सोडली, काँग्रेस पक्षाकडून मैदानात उतरणार|VIDEO

Maharashtra Live News Update: अकोल्यात नगरसेवक पदाचा अर्ज भरताना उमेदवारानं आणली 5 हजार रुपयांची चिल्लर

कोणत्या भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकल्यावर Acidity वाढते?

SCROLL FOR NEXT