Lakshmi Narayan Rajyog saam tv
राशिभविष्य

Lakshmi Narayan Rajyog: ४ दिवसांनी तूळ राशी बनणार लक्ष्मी नारायण योग; 'या' राशींच्या संपत्तीत होणार वाढ

Lakshmi Narayan Rajyog: शुक्र आणि बुध ग्रहाचा संयोग होणार असून त्यामुळे लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे. तूळ राशीमध्ये लक्ष्मी नारायण योग तयार झाल्यामुळे कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे, ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी धन, आकर्षण, प्रेम, ऐश्वर्य यांचा कारक मानल्या जाणाऱ्या शुक्र ग्रहाने त्याच्या राशीत बदल केला की, त्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येतो. शुक्राच्या गोचरमुळे अनेकदा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होतो, यावेळी शुभ राजयोग तयार होतो. लवकरच शुक्र आणि बुध ग्रहाचा संयोग होणार असून त्यामुळे लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे.

लक्ष्मी नारायण योगाच्या निर्मितीमुळे काही राशींचं नशीब उजळू शकणार आहे. यावेळी प्रदीर्घ प्रलंबित कामांच्या पूर्ततेबरोबरच संपत्तीतही वाढ होणार आहे. तूळ राशीमध्ये लक्ष्मी नारायण योग तयार झाल्यामुळे कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे, ते पाहूयात.

मेष रास

या राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे. करिअरमध्ये तुम्हाला काही मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. मोठा प्रकल्प मिळण्याची शक्यता जास्त असते. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे.

वृषभ रास

या राशीत लक्ष्मी नारायण योग तयार झाल्याने या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं. नवीन संधी मिळू शकतात. नवीन व्यवसाय सुरू करणे फायदेशीर ठरू शकणार आहे. आरोग्याबाबतच्या चिंता आता मिटणार आहे.

सिंह रास

या राशीमध्ये तृतीय घरात लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे. नोकरीमध्ये तुम्हाला अनेक नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायातही नफा मिळू शकतो. तुम्ही केलेली मेहनत कामी येणार आहे. आर्थिक स्थिती चांगली असू शकणार आहे. आरोग्य चांगले राहणार आहे. पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळू शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Indian footballer death news खेळताना अचानक मैदानावर कोसळला, २५ वर्षाच्या खेळाडूचा मृत्यू, क्रीडा विश्वावर शोककळा

Solapur : सोलापुरात SRPF जवानाची आत्महत्या; ६ जणांविरोधात गुन्हा दाखल, धक्कादायक कारण समोर

High Blood Pressure: 'या' व्यक्तींना उशीरा कळतो हाय BPचा त्रास अन्..., वेळीच व्हा सावध, जाणून घ्या सुरुवातीची लक्षणं

Summer Makeup Tips: उन्हाळ्यात ग्लोइंग लुक पाहिजे? मग वापरा या सोप्या मेकअप ट्रिक्स

SCROLL FOR NEXT