Ketu Gochar 2024 saam tv
राशिभविष्य

Ketu Gochar 2024: केतूचं नक्षत्र गोचर 'या' राशींना करणार मालामाल; आर्थिक फायद्यासह धनलाभही होणार

Ketu Gochar 2024: 10 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 11:31 वाजता पापी ग्रह केतू उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश केला आहे. केतूच्या नक्षत्र गोचरमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला एक ठराविक महत्त्व देण्यात आलं आहे. यामध्ये केतू ग्रहाला देखील खास महत्त्व आहे. केतूची राशी आणि नक्षत्र बदलाचा सर्व १२ राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. 10 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 11:31 वाजता पापी ग्रह केतू उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश केला आहे. यावेळी उत्तरा फाल्गुनी नक्षत्र 27 नक्षत्रांमध्ये 12 व्या क्रमांकावर आहे, ज्याचा स्वामी सूर्य देव आहे.

सूर्याच्या नक्षत्रात केतूच्या गोचरमुळे काही व्यक्तींच्या आयुष्यात बदल घडणार आहे. यावेळी काही लोकांना त्याचा फायदा होणार आहे. जाणून घेऊया केतूच्या नक्षत्र गोचरमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.

वृषभ रास

केतू गोचरामुळे वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मकता येणार आहे. तुम्हाला हव्या असलेल्या कंपनीत काम करण्याची संधी मिळू शकणार आहे. ऑफिसमध्ये सुरू असलेल्या समस्या संपणार आहेत. तुम्ही तुमचं लक्ष्य वेळेवर पूर्ण करू शकता. अचानक आर्थिक लाभामुळे व्यावसायिकांना घर खरेदी करता येऊ शकते.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी पापी ग्रह केतूचं गोचर चांगलं राहणार आहे. यावेळी व्यवसायात लाभामुळे आर्थिक संकट दूर होणार आह. वैवाहिक जीवनात आनंद राहणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होऊ शकतं.

धनु रास

आजपासून येणारे काही दिवस धनु राशीच्या लोकांच्या हिताचे असणार आहेत. यावेळी तुमच्या नोकरीमध्ये स्थिरता येऊ शकते. ऑफिसमध्ये तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. तुमच्या तब्येतीत सुधारणा होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT