ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग देखील तयार होतात. या राजयोगांच्या निर्मितीचा परिणाम प्रत्येक राशींच्या व्यक्तींवर होत असतो. येत्या काळात असाच एक राजयोग तयार होणार आहे.
18 सप्टेंबरला शुक्र स्वतःच्या राशीत तूळ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रहाच्या या गोचरमुळे केंद्र त्रिकोण राजयोग आणि मालव्य राजयोग तयार होणार आहेत. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येऊ शकतो. मात्र या काळात काही राशी अशा आहेत, ज्यांना याचा अधिक चांगला परिणाम दिसून येणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
केंद्र त्रिकोण राजयोग आणि मालव्य राजयोग या राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुम्ही ठरवलेली काम पूर्ण होऊ शकणार आहेत. कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो. करियरमध्ये तुम्हाला उत्तम संधी मिळू शकणार आहे. अविवाहितांना लग्नासाठी स्थळ येऊ शकते.
मकर राशीच्या लोकांसाठी केंद्र त्रिकोण राजयोग आणि मालव्य राजयोगाची निर्मिती शुभ ठरणार आहे. या काळात तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत वाढणार आहेत. लव्ह लाईफच्या बाबतीत तुम्हाला फायदा होऊ शकतो. कठीण परिस्थितीत देखील तुम्ही पैसे वाचवू शकाल. नोकरदार लोकांची ठिकाणी बदली होऊ शकते.
केंद्र त्रिकोण आणि मालव्य राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळू शकेल. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते. तुम्ही देश-विदेशात भटकंती करू शकणार आहात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमचे मित्र आणि बॉस यांचे पूर्ण सहकार्य मिळेल.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.