Guru Margi 2025 saam tv
राशिभविष्य

Guru Margi: तब्बल १२ वर्षांनंतर गुरु ग्रह होणार मार्गस्थ; 'या' राशींची नशिबाची दारं उघडणार, नव्या नोकरीसह मिळणार पैसाच पैसा

Guru Margi 2025: 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:09 वाजता ते सरळ मार्गाने चालणार आहेत. गुरु ग्रह 119 दिवस वक्री राहिल्यानंतर काही राशीच्या लोकांना याचा मोठा लाभ मिळू शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

नवीन वर्षाला सुरुवात झाली असून आज नव्या वर्षाचा दुसरा दिवस आहे. ज्योतिष्य शास्त्राच्या हिशोबाने हे नवीन वर्ष फार महत्त्वाचं मानलं जातंय. या वर्षात अनेक ग्रह त्यांच्या राशीमध्ये किंवा स्थितीमध्ये बदल करणार आहेत. ज्या बदलाचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे. असंच या वर्षी गुरु ग्रह मार्गस्थ होणार आहेत.

बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रह विशिष्ट कालावधीत रास बदलत असल्याने त्याची स्थितीही बदलत राहते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, नवीन वर्षात गुरु वृषभ राशीमध्ये वक्री स्थितीत आहेत. 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:09 वाजता ते सरळ मार्गाने चालणार आहेत. गुरु ग्रह 119 दिवस वक्री राहिल्यानंतर काही राशीच्या लोकांना याचा मोठा लाभ मिळू शकतो. गुरुच्या मार्गी हालचालीने कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

मेष रास

या राशीच्या लोकांसाठी गुरु प्रत्यक्ष असणं खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या ठिकाणी गुरु ग्रह दुसऱ्या घरात असणार आहे. गुरु ग्रहाच्या मार्गी हालचालीमुळे या राशीच्या लोकांच्या जीवनात आनंदाचं वातावरण निर्माण होणार आहे. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहू शकणार आहे.

कन्या रास

या राशीच्या नवव्या घरात गुरु ग्रहाचं भ्रमण होणार आहे. या राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. करिअर क्षेत्राबद्दल बोलायचं झाले तर आयुष्यात खूप आनंद मिळू शकणार आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. नशिबाच्या घरात गुरु मार्गी असल्याने या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात भरीव यश मिळवू शकतात. लव्ह लाईफ चांगलं जाणार आहे. आरोग्य चांगलं राहणार आहे.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीमध्ये गुरु पाचव्या घराचा स्वामी आहे. या काळात या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकणार आहे. या काळात तुम्हाला आर्थिक लाभही होऊ शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळात तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Price: मुंबईत पेट्रोल ५ रुपये स्वस्त दराने मिळणार; मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

ST NCMC Card: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक

अंबाबाईला अडीच कोटींचा सोन्याचा कळस, दीड किलो सोन्याचा कळस अंबाबाईच्या चरणी

Zp Scam: जिल्हा परिषदेत बोगस बिलांचा घोटाळा, CEOच्या बंगल्याला 25 लाखांची लाईटिंग

तुकाराम मुंढेंचा ऑपरेशन गुटखा’ यशस्वी! 350 जणांना अटक, 274 दुकाने सील, राज्यभर खळबळ

SCROLL FOR NEXT