Jupiter Transit Saam Tv
राशिभविष्य

Guru Uday: 12 वर्षांनंतर गुरु ग्रहाचा झाला उदय; 'या' राशींना बिझनेसमध्ये होणार नफा

Jupiter rise beneficial for which zodiacs: ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु हा ग्रह ज्ञान, धन, समृद्धी, विवाह आणि भाग्याचा कारक मानला जातो. गुरु एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी साधारणतः १२ महिन्यांचा कालावधी घेतो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ज्ञान, संपत्ती, संतती, विवाह आणि भाग्याचा देवता गुरू 9 जुलै 2025 रोजी मिथुन राशीत उदय झाला आहे. यावेळी गुरु ग्रह 18 ऑक्टोबरपर्यंत या अवस्थेत राहणार आहे. यासोबतच, तो या अवस्थेत कर्क राशीत प्रवेश करेल. मिथुन राशीत गुरुचा उदय काही राशीच्या लोकांना विशेष लाभ देऊ शकतो.

गुरुचा उदय काही राशींना भाग्याची साथ मिळण्यासारखा आहे. मिथुन राशीत गुरुच्या उदयामुळे या तीन राशींना भरपूर लाभ मिळू शकणार आहे. यावेळी काहींना चांगले पैसे मिळणार आहेत. तर काहींना करियरमध्ये चांगली संधी मिळणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

मकर रास

मकर राशीच्या लोकांना यावेळी अनेक क्षेत्रात प्रचंड यश मिळू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना विशेष परिणाम मिळू शकतात. तुम्ही निरुपयोगी खर्चापासून मुक्त होऊ शकणार आहात. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. गुरुची दृष्टी धनभावावर पडणार आहे.

धनु रास

या राशीच्या लोकांसाठी, गुरु ग्रहाचा उदय अनेक क्षेत्रांमध्ये अनुकूल परिणाम करू शकणार आहे. या राशीच्या लोकांमध्ये सर्जनशीलता आणि ज्ञान वाढू शकते. तुमची दीर्घकाळ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. तुमच्या कामातील अडथळे दूर होऊ शकतात. लग्न करण्यास इच्छुक असलेल्या लोकांना लग्नाचा प्रस्ताव मिळू शकतो. जर तुम्ही भागीदारीत कोणताही व्यवसाय करत असाल तर तुमच्या लोकांमधील गैरसमज आता संपू शकतात.

कुंभ रास

देवगुरू गुरू ग्रहाचा उदय होईल आणि पाचव्या घरात राहणार आहे. लॉटरी किंवा शेअर बाजाराद्वारे तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. मुलं होऊ इच्छिणाऱ्या लोकांना फायदा होऊ शकतो. कौटुंबिक व्यवसायात चांगला नफा होऊ शकतो. वडील आणि वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळू शकणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वसईत कार्यक्रमाच्या वेळी प्रवीण दरेकर लिफ्टमध्ये 15 मिनिटे अडकले

Monsoon Skin Care: ड्राय स्कीनला कंटाळात? तर करा 'हे' ५ सोपे घरगुती उपाय, त्वचा होईल सॉफ्ट

Space: स्पेसमध्ये किती वेगाने चालते इंटरनेट?

Bhandara News: वाळू माफियाची मुजोरी वाढली, पोलिसांच्या पथकावर ट्रॅक्टर चालवला, पाहा व्हिडिओ

Ind Vs Eng 4th Test : टीम इंडियाला सलग दोन धक्के, लागोपाठ दोन स्टार खेळाडू संघातून बाहेर; गिलचं टेन्शन वाढलं

SCROLL FOR NEXT