Guru Vakri saam tv
राशिभविष्य

Guru Vakri: गुरुची वक्री चाल ठरणार डोकेदुखी; 'या' राशींवर येणार आर्थिक संकट; खर्चात होणार वाढ

Guru Vakri: ज्यावेळी गुरु अशुभ स्थितीत असतो तेव्हा त्या व्यक्तीला गरिबी आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. गुरुची वक्री स्थिती कोणत्या राशींसाठी धोकादायक ठरणार आहे ते जाणून घेऊया.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रह हे उल्टी चाल देखील चालतात. नुकतंच गुरु ग्रह वक्री झाला आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु शुभ स्थितीत असतो तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनात धन, समृद्धी, पत्नी-सुख इत्यादी गोष्टींची कमतरता नसते. मात्र ज्यावेळी गुरु अशुभ स्थितीत असतो तेव्हा त्या व्यक्तीला गरिबी आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.

9 ऑक्टोबरला देवगुरु ग्रह वक्री झाला आहे. गुरू ग्रह वक्री झाल्यामुळे काही राशींसाठी हा काळ शुभ मानला जात नाही. गुरु 4 फेब्रुवारी 2025 पर्यंत 3 राशीच्या लोकांच्या जीवनात समस्या वाढवणार आहे. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींना सतर्क राहण्याचा सल्ला दिला गेलाय.

मिथुन रास

मिथुन राशीचे लोक गुरुच्या वक्री स्थितीमुळे चिडचिडे राहू शकतात. अनावश्यक खर्चावर नियंत्रण नसल्यामुळे आर्थिक समस्या वाढू शकतात. कामात अडथळे येतील आणि पदोन्नतीला विलंब होऊ शकतो. कौटुंबिक जीवनावर नकारात्मक प्रभाव पडणार आहे. विवाहित जोडीदाराशी संबंध बिघडू शकतात. आरोग्य सांभाळण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

तूळ रास

तूळ राशीच्या व्यक्तींना गुरुच्या वक्री स्थितीचा त्रास होऊ शकतो. नोकरीत अस्थिरता येण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या प्रवासात अडचणी येऊ शकतात. तुमचे तुमच्या पार्टनरसोबत मतभेद होऊ शकतात. घरातील वातावरण तणावपूर्ण राहण्याची सक्यता आहे. डोळ्यांसंबंधी समस्या उद्भवू शकतात.

मकर रास

गुरुच्या वक्री चालीमुळे या राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात मोठे अडथळे येऊ शकतात. छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल तुम्हाला वाईट वाटू शकतं. नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी काळजीपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे. तुम्ही करत असलेल्या बिझनेसमध्ये मंदी येऊ शकते. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होऊ शकतात. प्रेमसंबंधामध्ये दुरावा येण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

SCROLL FOR NEXT