Shani Gochar saam tv
राशिभविष्य

Shatank Yog: न्यायाधीश शनी तयार करणार अद्भुत योग; 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम

Shani Guru Shatank Yog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेव हे कर्मफलदाता आणि न्यायाचे देवता मानले जातात. त्यांची चाल खूप मंद असली तरी, त्यांच्या बदलामुळे किंवा विशिष्ट योगांच्या निर्मितीमुळे मानवी जीवनावर खूप मोठा आणि दीर्घकाळ टिकणारा परिणाम होतो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि हा सर्वांत शक्तीशाली आणि कठोर ग्रह मानला जातो. हा ग्रह अत्यंत धीम्या गतीने चालतो आणि एका राशीत तब्बल अडीच वर्ष राहतो. त्यामुळे शनीचा इतर ग्रहांशी वारंवार संयोग होत असतो. सध्या शनी मीन राशीत वक्री अवस्थेत आहे आणि जुलैच्या अखेरीस ते गुरु बृहस्पतीसोबत विशेष संयोग करून शतांक योग तयार केला आहे.

या राजयोगाचा प्रभाव काही राशींवर अत्यंत शुभ दिसून येणार आहे. यावेळी काही राशींना नशीब साथ देईल, अडकलेले काम पूर्ण होतील आणि समाजात मान-सन्मान वाढणार आहे. ३१ जुलै रोजी रात्री १०:०९ वाजता शनी आणि गुरु हे दोन ग्रह एकमेकांपासून १०० अंशांवर असणार आहेत. त्यामुळे शतांक योग तयार होणार आहे.

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा योग अत्यंत फायदेशीर ठरू शकणार आहे. अनेक महिन्यांपासून अडकलेली कामं आता पूर्ण होऊ शकणार आहेत. गुरु तुमच्या धन स्थानात असून अचानक धनलाभाचे योग तयार होणार आहेत. गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर ही वेळ अनुकूल आहे.

मकर रास (Capricorn)

मकर राशीच्या लोकांसाठी शनि आणि गुरुचा शतांक योग फायदेशीर ठरणार आहे. बराच काळ अडकलेली कामं आता मार्गी लागणार आहे. आरोग्य सुधारणार आहे आणि मानसिक शांती मिळेल. नवीन संधी मिळतील आणि व्यापारासाठी प्रवासही करावा लागू शकतो.

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी हा योग भरपूर संधी घेऊन येतोय. तुम्हाला सर्व क्षेत्रात चांगलं यश मिळू शकतं. अभ्यासात मन लागेल लक्ष केंद्रित होईल. याशिवाय नवीन नात्यांना सुरुवात होऊ शकणार आहे. विवाहासाठी इच्छुक लोकांना चांगले प्रस्ताव येऊ शकतात. नशीब तुमच्या बाजूने असेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आज उल्हासनगरमध्ये ७ स्वीकृत नगरसेवकांची निवड

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rain Alert: परतीच्या पावासाचा तडाखा, कोकण अन् मध्य महाराष्ट्राला झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

SCROLL FOR NEXT