Grah Gochar saam tv
राशिभविष्य

May Grah Gochar: मे महिन्यात बुध-शुक्रासह ७ ग्रह बदलणार चाल; 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार, धनवर्षा होणार

Grah Gochar: मे महिन्यात अनेक ग्रह त्यांच्या स्थितीमध्ये बदल करणार आहे. यामध्ये पहिल्याच दिवशी चंद्र आपला मार्ग बदलणार आहे. तर शुक्र ग्रह या महिन्याच्या अखेरीस गोचर करेल. कोणत्या राशींना सर्वात जास्त फायदा होईल ते जाणून घेऊया

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्राच्या हिशोबाने मे महिना खूप खास असणार आहे. या महिन्यामध्ये गुरु, राहू आणि केतू त्यांच्या हालचालातील बदल करणार आहेत. २०२५ या वर्षाचा पाचवा महिना चंद्राच्या गोचराने सुरू होणार आहे. तर महिन्याचा शेवट शुक्र राशीच्या गोचरमुळे होणार आहे. ३१ मे रोजी राक्षसांचा गुरु मेष राशीत प्रवेश करेल.

१५ मे रोजी सूर्य शुक्र वृषभ राशीत भ्रमण करणारल असून १४ मे रोजी चंद्र मिथुन राशीत भ्रमण करणार आहे. १८ मे रोजी राहूचं कुंभ राशीत आणि केतूचं सिंह राशीत गोचर होणार आहे. २३ मे रोजी ग्रहांचा राजकुमार बुध वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. या सर्व ग्रहांच्या हालचालीतील बदलाचा परिणाम सर्व १२ राशींच्या जीवनावर होणार आहे.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी मे महिना खूप खास मानला जातोय. या काळात काही चांगली बातमी मिळू शकणार आहे. जीवनात सकारात्मक बदल दिसून येण्याची शक्यता आहे. व्यवसायात गुंतलेल्या लोकांना मोठा नफा मिळू शकतो.

मकर रास

मकर राशीच्या लोकांना ग्रहांच्या गोचरचा अधिक फायदा होणार आहे. आर्थिक लाभाची दाट शक्यता असणार आहे. तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळू शकणार आहे. कुटुंबात आनंद आणि शांतीचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. धार्मिक आणि शुभ कार्यक्रमांचे आयोजन केले जाऊ शकते.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठीही हा काळ अनुकूल राहणार आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण होणार आहेत. तुम्हाला पदोन्नती मिळू शकते. या काळात पती-पत्नीमधील मतभेद संपणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला, काय आहे कारण?

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT