Rashi Surya Gochar  google
राशिभविष्य

Surya Gochar: जानेवारीत सूर्य ग्रह करणार २ वेळा गोचर; 'या' राशींना लागणार जॅकपॉट, मिळणार भरपूर पैसा

ज्योतिषशास्त्रानुसार, येत्या जानेवारी महिन्यात सूर्य दोनदा गोचर करणार आहे. हा गोचर काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार असून त्यांना आर्थिक लाभ, संपत्ती आणि भाग्याची साथ मिळणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक पंचांगानुसार ग्रहांचा राजा सूर्यदेव जानेवारी महिन्यात दोन वेळा गोचर करणार आहेत. सूर्यदेव सर्वप्रथम 11 जानेवारीला उत्तराषाढा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. हे त्यांचं स्वतःचं नक्षत्र आहे. त्यानंतर सूर्यदेव शनीच्या स्वामित्वाच्या मकर राशीत प्रवेश करतील.

त्यामुळे जानेवारी महिन्यात सूर्य दोन वेळा गोचर करणार आहे. सूर्यदेवाच्या या गोचरामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. या लोकांना पद-प्रतिष्ठा मिळू शकते आणि मन प्रसन्न राहणार आहे. यावेळी कोणत्या राशींना याचा लाभ होणार आहे ते पाहूयात.

मेष रास (Aries Zodiac)

मेष राशीच्या लोकांसाठी सूर्यदेवाचा राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन सकारात्मक ठरू शकतो. त्यामुळे या काळात तुम्हाला व्यवसायात विशेष प्रगती मिळू शकते. कार्यक्षेत्रात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल आणि तुमचा मान-सन्मान वाढेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात.

धनु राशि (Dhanu Zodiac)

धनु राशीच्या जातकांसाठी सूर्यदेवाचा गोचर अनुकूल ठरू शकणार आहे. हे गोचर तुमच्या राशीपासून धनभावात होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला वेळोवेळी आकस्मिक धनलाभ होऊ शकतो. या काळात तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल आणि आत्मविश्वास वाढेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.

सिंह राशि (Leo Zodiac)

सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्यदेवाचा गोचर सकारात्मक ठरू शकतो. या काळात तुम्हाला कोर्ट-कचेर्‍याच्या प्रकरणांत यश मिळू शकतं. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे आणि व्यापारात नफा वाढणार आहे. आर्थिक स्थितीही चांगली राहणार आहे. या काळात तुमच्या योजना यशस्वी होतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suhasini Mulay: सोशल मीडियावरून जुळल्या मनाच्या तारा; ६०व्या वर्षी प्रेमात पडली अभिनेत्री, अवघ्या ७५ दिवसांत बांधली लग्नगाठ

तांदूळ, ज्वारी की बाजरी? डायबिटीजच्या रूग्णांनी कोणती भाकरी खावी?

Maharashtra News Live Update: नाशिकच्या मनमाड नगरपरिषदेची उद्या पोटनिवडणूक

Cable Stayed Bridge : खुशखबर! ठाणे-नवी मुंबई प्रवास अवघ्या काही मिनिटांत होणार; कोपरी ते पटनीदरम्यान पूल उभारला जाणार, कसा असेल मार्ग?

'पाणी द्या, अन्यथा...'; डोंबिवलीकरांचा पाणीटंचाईवरून संताप, महिलांचा पालिकेवर हंडा-कळशी मोर्चा

SCROLL FOR NEXT