Kendra Trikon Rajyog saam tv
राशिभविष्य

Kendra Trikon Rajyog: 12 महिन्यांनी शुक्र ग्रह बनवणार पावरफुल केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना मिळणार सुख-पैसा

Kendra Trikon Rajyog 2025: २९ जूनला शुक्र ग्रह वृषभ राशीत विराजमान होणार असून त्यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होईल. या विशेष योगामुळे काही राशींचं नशीब चमकणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोगांची निर्मिती होते. यामध्ये काही राजयोगांमुळे काही राशींच्या व्यक्तींना लाभ मिळतो. येत्या काळात अशाच एका राजयोगाची निर्मिती होणार आहे.

केंद्र त्रिकोण राजयोग हा राजयोग २९ जून रोजी तयार होणार आहे. कारण शुक्र स्वतःच्या वृषभ राशीत भ्रमण करणार आहे. अशा परिस्थितीत या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींचे भाग्य बदलू शकणार आहे. यावेळी काही राशींना खूप पैसे मिळणार आहेत तर काहींना या काळात चांगलं यश मिळणार आहे.

सिंह रास

केंद्र त्रिकोण राज योगाची निर्मिती मकर राशीच्या लोकांसाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ ठरू शकणार आहे. तुम्हाला नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम यश घेऊन येणार आहे. वडिलांशी संबंध चांगले राहतील.

कन्या रास

केंद्र त्रिकोण राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुमचं भाग्य वाढू शकणार आहे. तुम्ही लहान किंवा लांब प्रवासाला जाऊ शकता. प्रेमाशी संबंधित बाबींमध्ये रस वाढणार आहे. या काळात तुम्ही अनेक आध्यात्मिक प्रवासांना देखील जाऊ शकता.

वृषभ रास

केंद्र त्रिकोण राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. तुमचं व्यक्तिमत्व सुधारणार आहे. जे अविवाहित आहेत त्यांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. तुम्हाला जीवनात आनंद आणि समृद्धी मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT